तरुण भारत

कॅन्टोन्मेंटच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद

3 कोटी 13 लाख रुपये वीजबिल थकल्याने हेस्कॉमची कारवाई : परिसर अंधारात

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कॅन्टोन्मेंट बोर्डने हेस्कॉमचे 3 कोटी 13 लाख रुपये विद्युत बिल थकविले आहे. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही विद्युत बिल भरणा केले नसल्याने कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध परिसरातील पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. परिणामी कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांवर अंधार पसरला आहे.

मागील चार वर्षांपासून केंद्र आणि राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला अनुदान मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. शासनाकडून मिळणाऱया आणि विविध महसूल उत्पन्नातून कॅन्टोन्मेंटचा कारभार सुरू आहे. पण हा निधी तुटपुंजा असल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला एसएफसी अनुदान देण्यात येत होते. मिळणाऱया अनुदानामधून पथदीप आणि पाणी पुरवठय़ाचे विद्युत बिल भरण्यात येत होते. पण 2012 पासून हे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे हेस्कॉमचे बिल थकले आहे.

केंद्र शासनाकडून सेवाकराच्या नावाखाली अनुदान देण्यात येत होते. पण हे अनुदानदेखील चार वर्षांपासून मंजूर करण्यात आले नाही. परिणामी 5 कोटींहून अधिक रक्कम पाणीपुरवठा आणि विद्युत बिलापोटी कॅन्टोन्मेंट बोर्डला भरावी लागणार आहे.

पुढील कारवाई करण्याचाही विचार

विद्युत बिलाची रक्कम भरण्यासाठी हेस्कॉमने तगादा लावला होता. पण निधी नसल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने बिलाची रक्कम अदा केली नाही. बिल भरा, अन्यथा विद्युत पुरवठा तोडू, असा इशारादेखील हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डला दिला होता. सध्या निधी नसल्याने कॅन्टोन्मेंटने विद्युत बिल अदा केले नाही. त्यामुळे हेस्कॉमने कॅन्टोन्मेंटच्या पथदिपांचा विद्युत पुरवठा चार दिवसांपासून बंद ठेवला आहे. सध्या पहिल्या टप्प्यात हेस्कॉमने पथदिपांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. पाणीपुरवठा व कार्यालयाचा विद्युत पुरवठा सुरू ठेवला आहे. थकीत बिलाची रक्कम भरण्यासाठी प्रयत्न न केल्यास पुढील कारवाई करण्याचा विचार हेस्कॉमने चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

शुक्रवारी 114 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

अनधिकृत वसाहती अधिकृत करा

Omkar B

पद्मभूषण डॉ.पद्माकर दुभाषी यांचे निधन

Patil_p

हिरेबागेवाडीला राज्य परिवहन मंडळाच्या व्यवस्थपकांची भेट

Rohan_P

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p

पथदीप बसविले, मातीचे ढिगारे जैसे थे

Amit Kulkarni
error: Content is protected !!