तरुण भारत

झारखंडच्या गुन्हेगारांना बेंगळूर पोलीस घेणार ताब्यात

ऑनलाईन फसवणूक प्रकरणाच्या चौकशीला वेग : अन्य राज्यातील पोलिसांनाही माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

ऑनलाईन फसवणूक प्रकरणी सीईएन पोलिसांनी अटक केलेल्या झारखंडमधील दाम्पत्यासह त्रिकुटाला बेंगळूर पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. लवकरच एक पथक यासाठी बेळगावला येणार असून झारखंडच्या भामटय़ांनी आणखी किती गुन्हे केले आहेत, कोणकोणत्या राज्यात केले आहेत? याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

चंद्रप्रकाश दास (वय 30), त्याची पत्नी आशादेवी (वय 25, दोघेही रा. झारखंड) व त्यांचा साथीदार अन्वर शेख (वय 24, रा. नाशिक) या तिघा जणांना सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी अटक केली आहे. या भामटय़ांनी वेगवेगळय़ा बँक खात्यांतून हडप केलेले 12 लाख 56 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

प्राथमिक तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार झारखंडच्या दाम्पत्याने बेळगाव, हैदराबाद, बेंगळूर, गुलबर्गा येथे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. या सर्व प्रकरणांत त्यांची चौकशी होणार आहे. वेगवेगळय़ा बँकांमध्ये त्यांनी 50 खाती उघडल्याचे पोलीस तपासात सामोरे आले आहे. ऑनलाईन फसवणुकीतून मिळणारी रक्कम या खात्यांवर ठेवण्यात येत होती.

उपलब्ध माहितीनुसार बेळगाव पोलिसांनी चंद्रप्रकाश व आशादेवी दाम्पत्यासह अटक केलेल्या गुन्हेगारांची माहिती वेगवेगळय़ा राज्यातील पोलिसांनाही दिली आहे. त्यामुळे आता फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक व रक्कम जमा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांसह आणखी किती ठिकाणी फसवणूक झाली आहे, याचा तपास करण्यात येत आहे.

टोळीच्या गुन्हेगारीची व्याप्ती व्यापक

ऑनलाईन फसवणुकीसाठी 48 मोबाईल, 304 हून अधिक सीमकार्डे, 50 वेगवेगळय़ा बँकांमध्ये खाती उघडली आहेत. ही गोष्ट लक्षात घेता झारखंडमधील दाम्पत्यासह या टोळीच्या गुन्हेगारीची व्याप्ती व्यापक आहे. त्यामुळे त्यांची कसून चौकशी करून या टोळीने आणखी कोणत्या राज्यात गुन्हे केले आहेत? याची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

संकेश्वर 28 दिवस सीलडाऊन

Patil_p

निशिकांतच्या मोबाईलमधून मेसेज कोणी केला?

Patil_p

पतंग उडविण्याचा हेका,हेस्कॉमला फटका

Amit Kulkarni

गँगवाडी येथील महिलेवर चाकूहल्ला

Patil_p

अभिवाचन स्पर्धेत वाङ्मय चर्चा मंडळाचे यश

Amit Kulkarni

एपीएमसीत कांदा भाव वधारला

Patil_p
error: Content is protected !!