तरुण भारत

हेल्दी टिप्स

संध्याकाळ जायफळ चूर्ण एक ग्लास पाण्यासह घ्यावे. देशी शुद्ध तूप रात्री झोपताना जायफळासह पापण्यांना लावल्यामुळे निद्रानाश हा विकार दूर होतो. जीव घाबरा झाल्यास एक कप पाण्याबरोबर चिमूटभर जायफळ मिसळून प्यावे. ताजेतवाने वाटते.

आपण जर दातदुखीने त्रस्त असाल आणि आपणास डेंटिस्टकडे जाणे शक्य नसेल तर अशा वेळी एक लवंग हळूहळऊ चावावी. यामुळे दातांच्या वेदना तसेच हिरडय़ांची सूज दोन तासांसाठी दूर हेते. लवंगामध्ये युजीनोल नावाचे एक नैसर्गिक कंपाऊंड असते. हे एक शक्तीशाली एनेस्थेटिक आहे. दररोज आपल्या भोजनात पाव चमचा लवंग पावडरचा शिरकाव करण्याने हृदयाचे रक्षण होते.

Advertisements

जेवणापूर्वी सूप किंवा सॅलड हा खरोखरच उपयुक्त प्रकार आहे. सूप ही भूकवर्धक असतात, तर सॅलडस् कॅलरीपूरक असतात. सॅलडमध्ये काकडी, बीट, कांदा, गाजर, मुळे, टोमॅटोच्या चकत्या व फोडी माफक मीठ, मिरीपावडर किंवा कढीपत्याची पावडर टाकून खावे. सॅलडमुळे कोठा शांत होतो. व्यवस्थित कॅलरीज मिळतात. सॅलडने थोडे पोट भरल्याने मसालेदार व अतिरिक्त जेवण कमी होते.

संत्रा हे फळ क जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. याखेरीज शरीराला पौष्टिकता देणारे अनेक गुणधर्म संत्र्यांमध्ये असतात. दररोज तीन-चार संत्री खाण्याने जठराग्नी तीव्र होतो आणि आतडय़ांचीही शुद्धी होते. तापाने पीडित व्यक्तीला संत्र्याचा रस पाजल्याने त्यास ताकद मिळते आणि तापापासून लवकर सुटकारा मिळतो. छोटय़ा मुलांसाठी संत्र्याचा रस हा मातेच्या दुधासमान उपयोगी आहे. जी मुले केवळ आईच्या दुधावर आश्रीत असतात त्यांना संत्र्याचा थोडा थोडा रस पाजत राहिल्यास त्यांचा कित्येक रोगांपासून बचाव होतो आणि ती धष्टपुष्ट होतात. संत्र्याच्या सेवनाने भोजनाप्रतीची अरुची दूर होते. पाचनशक्ती आणि भूक वाढते. दररोज सकाळी अथवा रात्री झोपताना एक किंवा दोन संत्री खाण्याने मलावरोध दूर होतो.

Related Stories

पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढेल

Amit Kulkarni

भारताच्या प्रत्युत्तराने POK चे मोठे नुकसान; नेत्यांची कबुली

datta jadhav

मुलांमधील पाठदुखी

Amit Kulkarni

आला पावसाळा ओले मास्क टाळा

Amit Kulkarni

पित्तशूल आणि ऍलोपॅथी

Omkar B

मान दुखत असल्यास

Amit Kulkarni
error: Content is protected !!