तरुण भारत

प्रोटिन्सचे सेवन कसासाठी

सध्याचा काळात आहारतज्ञ आणि डॉक्टर हे सर्व कोरोनाग्रस्त, कोविडमधून बरे झालेले रुग्ण त्याचबरोबर सामान्य नागरिकांना देखील रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला देत आहेत. यासाठी प्रोटिनचे सेवन करण्याचा सल्ला देत आहेत. प्रोटिन केवळ स्नायू बळकट करत नाही तर शरीर तंदुरुस्त ठेवण्याचे काम करते. प्रोटिनच्या अभावामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्याला हानी पोचते.

मूड स्विंगः दररोज रात्री प्रोटीनचे प्रमाण गरजेनुसार नसल्यास मूड बिघडतो. चिडचिडेपणा, औदासिन्य, नैराश्य वाढते. प्रोटिन आपल्या शरिराच्या विविध हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटरमध्ये संतुलन ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रोटीनच्या कमरतेमुळे सेरोटोनिनसारख्या हॅपी हार्मोन्सची पातळी कमी होवू शकते.

Advertisements

नख, केस आणि त्वचा : आपली त्वचा, नख आणि केस हे प्रोटिनमुळे तयार होतात. त्याचे प्रमाण कमी राहिल्यास तिन्ही घटकांवर त्याचा परिणाम होतो. जर प्रोटिनची कमतरता राहिल्यास त्वचा कोरडी पडते, लाल होते, डिसपिगमेंटेशनची समस्या वाढते. केस पातळ होणे आणि केस गळण्याची समस्या देखील वाढते. नख जाड होतात. त्वचेवर सूज येते. त्यामुळे शरिराच्या वजनानुसार प्रति किलाग्रम एक ते दीड ग्रम प्रोटीन दररोज घ्यायला हवे.

क्रेविंग : आपले शरिर सक्रिय राहण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी पोषक तत्त्वांची नितांत गरज आहे. आपण त्यास पोषक तत्त्वे दिली नाही तर रक्तातील साखरेचे प्रमाण घसरते. त्यामुळे क्विक फिक्स सोल्यूशनच्या रुपातून भूक लागल्यानंतर कचोरी, सामोसे, भजे यासारखे नुकसानकारक पदार्थ खाण्यात येतात. या स्थितीतून वाचण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रोटिन रिच फूड घेतले पाहिजे.

हाडांचा ठिसूळपणा : हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम असणे गरजेचे आहे. पण हाडांतील घनत्वचे 50 टक्के प्रमाण हे प्रोटिनचे असते. त्यामुळे जीवनसत्त्व ड आणि कॅल्शियमबरोबरच प्रोटीन देखील हाडांना मजबूत करण्यासाठी आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी गरजेचे आहे.

वजनावर नियंत्रण : चांगल्या रितीने वर्क आउट केल्यानंतरही आणि तेलकट पदार्थापासून दूर राहिल्यानंतरही वजन नियंत्रित नसेल तर आपल्या आहारातील प्रोटीनच्या प्रमाणांवर भर द्यायला हवा. योग्य प्रमाणात प्रोटीन नसल्यास स्नायू दुरुस्त होत नाहीत. परिणामी वर्कआउटच्या वेळी फॅट बर्न होतात आणि स्नायू कमकुवत होतात. कमी प्रोटीनने आपली एनर्जी लेवल देखील घसरते. म्हणूनच  दररोजच्या आहारात प्रोटीनचे निश्चित प्रमाण असायला हवे.

– डॉ. संतोष काळे

Related Stories

टेस्टोस्टेरॉनची कमरता असल्यास

Omkar B

रक्तगटानुसार आहारनियोजन

Omkar B

बाळानंमधील फूड एलर्जी

Amit Kulkarni

कोविडग्रस्त मातांनी स्तनपान करावे का ?

Amit Kulkarni

अशक्त यकृत आणि कोविड

Amit Kulkarni

आज जागतिक अल्झायमर्स डे … डिमेंशियाबद्दल बोलूया

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!