तरुण भारत

पोटावरील चरबी कमी करायचीय ?

कंबर आणि पोटावरची चरबी कमी करणे हे सोपे नाही. यासाठी सिटअप्सचा व्यायाम फायदेशीर ठरतो.

  • सिट अप्सचा व्यायाम केवळ पोटापुरताच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण शरिरावर त्याचा परिणाम होतो. मांडी अधिक मोठी असेल तर ते कमी करण्यासाठी सिट अप मोलाची मदत करु शकते.
  • जर्नल ऑफ कंडिशनिंगमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार सलग दहा मिनिटे आराम न करता सिट अप करत असाल तर जवळपास 60 कॅलरी बर्न होऊ शकते. आपले वजन 68 किलोपेक्षा अधिक असेल तर अधिक कॅलरी बर्न होवू शकते. अर्थात केवळ सिट अप्सने संपूर्ण चरबी कमी होणार नाही.
  • जोडीला आणखी काही व्यायाम केल्यास आपल्या पोटाचे स्नायू अधिक बळकट होतील आणि आपला कोर देखील मजबूत होईल. या माध्यमातून शरीर अधिक कॅलरी बर्न करु शकेल. या कारणामुळे फॅट देखील लवकरच बर्न होईल.
  • आपण पोट कमी करु इच्छित असाल तर एक वेळापत्रक तयार करावे लागेल. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा समावेश असेल.
  • यामध्ये क्रंच, लंज, लेग रेज, रिव्हर्स क्रंच आदी व्यायामाचे प्रकार समाविष्ट करावे लागतील.
  • कोणताही व्यायाम करताना घाई करु नका. व्यायाम करण्यापूर्वी थोडा वार्म अप करणे गरजेचे आहे. व्यायामाबरोबर डायटवर देखील फोकस करावे लागेल.

Related Stories

सोरायसिसच्या अंतरंगात….

Omkar B

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

फ्लोअर क्लीनर घेताना…

tarunbharat

कोरोना आजारातील महत्वाचे दिवस

Amit Kulkarni

सांभाळा गॅस्ट्रोपासून

Omkar B

मातीच्या भांड्यातील अन्न का खावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!