तरुण भारत

इलेक्ट्रॉनिक डस्टपासून जपा

आजच्या काळात तंत्रज्ञानाने जीवन सुलभ बनलेले असले तरी तंत्रज्ञानातील नवआयुधांमुळे आरोग्यसमस्याही उद्भवत आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत असताना त्याच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नाहीये. या उपकरणातून निघणारी धूळ ही आरोग्याला हानीकारक ठरू शकते. 

  • तज्ञांच्या मते इलेक्ट्रॉनिक डस्ट ही नाकातील इन्फेक्शन वाढवण्याचे काम करते. या बारीक धुळीत कार्बनचे प्रमाण अधिक असल्याने ती आरोग्याला हानीकारक असते.
  • ही धूळ श्वासाच्या माध्यमातून नाकातून जाऊन फुफ्फुसाच्या पडद्यापर्यंत पोचते. त्यातून सर्दी, खोकला, डोकेदुखी, डोके जड पडणे, आवाजात बदल, ताप, अस्वस्थता, डोळ्याला खाज सुटणे, नाक आणि दातदुखी, वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम यासारख्या समस्या भेडसावू शकतात.
  • दीर्घकाळापर्यंत धुळीच्या संपर्कात राहिल्यास श्वसनाशी निगडीत आजारही उदभवतात. हे धुळीचे कण फुफ्फुसापर्यंत गेल्यामुळे दम्यासारखा आजार निर्माण होवू शकतो. यापासून बचाव करण्यासाठी फ्रिज, एसी, संगणक, मोबाईल आदी उपकरणांची नियमित साफसफाई करावी.
  • उपयोगात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू झाकून ठेवाव्यात. धुळीमुळे किंवा कचर्यामुळे आरोग्याशी निगडीत कोणत्याही अडचणी आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Related Stories

समस्या वॉटर रीटेन्शनची

Amit Kulkarni

एक तास कमी झोपताय

Amit Kulkarni

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

Omkar B

चर्चा जलनेतीची

Omkar B

यात असतात कार्बोदकं… डाएट अँड न्यूट्रिशन

tarunbharat

55 लाखात वाढविली 2 इंच उंची

Patil_p
error: Content is protected !!