तरुण भारत

मुख्यमंत्री बदलाच्या केवळ अफवा : खासदार राघवेंद्र

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात भाजप नेतृत्व बदलाच्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहेत. याविषयी बोलताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र शिवमोग्याचे लोकसभेचे खासदार बी. वाय. राघवेंद्र यांनी सांगितले की कर्नाटक सरकारमधील नेतृत्व बदलाच्या चर्चा केवळ अफवा आहेत.

“मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बर्‍याच वर्षानंतर कर्नाटकात भाजपची सत्ता आणली. भाजप मजबुत केला. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा निराधार आहेत. नेत्यांनी केलेल्या अशा विधानांकडे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष दिले पाहिजे आणि यामुळे पक्षालाच नुकसान होईल, असे राघवेंद्र यांनी पत्रकारांना सांगितले.

दरम्यान गेली दोन दिवस झाले राज्यातील विविध मठाधीशांनी येडियुराप्पांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “हे कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात लॉबिंगचा भाग म्हणून पाहिले जाऊ नये,” असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांची संख्या केली कमी

Shankar_P

कर्नाटकात शनिवारी ९ हजारून अधिक रुग्णांची भर

Shankar_P

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट

Shankar_P

गरुड स्पेशल फोर्सेसने ‘एरो इंडिया शो’ला दिली सुरक्षा

triratna

लॉकडाऊनमुळे कर्नाटकातील चार परिवहन महामंडळांचे ३,७०० कोटी रुपयांचे नुकसान

Shankar_P

कर्नाटक सरकारने ऑनलाइन गेमद्वारे जुगार खेळण्यावर घातली बंदी

Shankar_P
error: Content is protected !!