तरुण भारत

पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, म्हणाले…


मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. तसंच ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही त्या गैरहजर होत्या. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांमुळे पंकडा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वरळीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी ही भेट झाली आहे.

या भेटीविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकाच पक्षातील दोन नेत्यांची भेट होणं स्वाभाविक आहे. यात वेगळं असं काहीच नाही. त्याचबरोबर ही भेट गुप्त नाही तर उघडपणे सर्वांसमोर झाली. त्यामुळेच या भेटीचे फोटो कालपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आम्ही दोघे भेटलो यात बातमी काय? अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी मोदी-शाह-नड्डा हेच आपले नेते असल्याचं म्हटलं होतं. “माझ्याविषयी मागील दोन तीन दिवसात जी विधान केली गेली ती मी लिहून ठेवली आहेत. त्यामध्ये भाजपातील कोणत्याही नेत्याने नकारात्मक भाष्य केलेलं नाही. पण काही नेत्यांनी असं विधानं केली की पक्षाने काय दिलं, हे पंकजा मुंडेंनी लक्षात ठेवावं आणि ते विधान त्या नेत्यांकडून वारंवार केलं गेलं. माझं इतकंच म्हणणं आहे की पक्षाने मला जे दिलंय ते मी लक्षात ठेवेन, पण मलाच दिलं नाही. अनेकांना दिलंय. मग सतत का बोलून दाखवलं जातं”, असं पंकजा म्हणाल्या होत्या. त्यावर आपण मोदी, शाह, नड्डा यांचं नाव घेतलं, मग देवेंद्र फडणवीसांचं का नाही घेतलं? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. “मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत”, असं पंकजांनी म्हटलं होतं.

Related Stories

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Rohan_P

माढा तालुक्यात २२ कोरोनाबाधितांची वाढ ; एकूण ४८० बाधित

triratna

अवैध दारु विकणाऱया नऊजणांवर कारवाई

Patil_p

दिल्ली : बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू

Rohan_P

मुख्यमंत्री बोम्माईंनी डीके प्रशासनाला दिला १० दिवसांचा अल्टिमेट

triratna

राज्यस्तरीय माध्यम शिक्षक संघटना अध्यक्षपदी भटकर तर कार्याध्यक्षपदी चिंचोलकर

triratna
error: Content is protected !!