तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकणातील पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

प्रतिनिधी / रत्नागिरी

गेल्या दोन दिवसापासून कोकण परिसरात धुवाधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांची गंभीर दखल घेत कोकणातील पूरपरीस्थितीचा आढावा घेतला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्ग चे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे दिले आदेश.

पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांना दिले.’

Related Stories

जमावबंदी मोडणाऱया शिवसेना कार्यकर्त्यांवर कारवाई करा!

NIKHIL_N

दारुबंदीवरून देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत रूपाली चाकणकर म्हणाल्या…

triratna

‘नमन’ लोककलावंतांचे प्रथमच उभे झालेय जिल्हास्तरीय संघटन

Patil_p

महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन होणार जाहीर 

pradnya p

पत्नी निधनाच्या धक्क्याने अवघ्या काही तासात पतीचे निधन

Ganeshprasad Gogate

व्यंकय्या नायडूंच्या ‘ट्विटर’ अकाउंटला पुन्हा ब्लू टिक

datta jadhav
error: Content is protected !!