तरुण भारत

राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी


मुंबई \ ऑनलाईन टीम

मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून जोर धर आहेत. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ज्या नागरिकांना, प्रवाशांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी राज यांनी पत्रातून केली आहे.

मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही जोडले आहे.


यापूर्वी देखील राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधात सूट देण्याचा विचारही करत असल्याचे सांगितलं आहे. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे लोकल सुरू करण्याची मागणी केली आहे.

Advertisements

Related Stories

जम्मू : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 ठार, एकाची शरणागती

pradnya p

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

triratna

पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दोनों फेल’ : राहुल गांधी

pradnya p

24 व्या आठवडय़ातही करता येणार गर्भपात

prashant_c

कोल्हापुरात 50 वर्षांवरील सर्वांची वैद्यकीय तपासणी होणार

Shankar_P

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

pradnya p
error: Content is protected !!