तरुण भारत

करमाळ्यात एका सहशिक्षकाची आत्महत्या


करमाळा / तरुण भारत संवाद प्रतिनिधी :


गुळसडी (ता.करमाळा) येथील विठामाई खंडागळे  माध्यमिक शाळेतील सहशिक्षक बळीराम गोविंद वारे (वय-46) यांनी आज (ता.22) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील गणेशनगर येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

Advertisements


श्री.वारे हे गुळसडी येथील विद्यालयात सन 2002 पासून कार्यरत होते. कला व मराठीचे शिक्षक शिकवत होते. त्यांची आर्थिक फसवणूक झाली असून त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले आहे. 
श्री.वारे यांचे मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते गणेशनगरमध्ये रहात होते. त्यांचे मुळ गाव रत्नापूर (ता.जामखेड) हे असून हिवरे त्यांची सासरवाडी आहे. पुर्वी दुध संघात कार्यरत असणारे शैलेश वारे यांचे ते बंधु होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक गेल्याचे दुःख मुख्याध्यापक एस.एम. शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली असून नेमके आत्महत्येचे कारण काय हे पोलीस तपासात समजणार आहे.

Related Stories

लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळाला : गिरीश बापट

prashant_c

मैफलीतून उलगडला डॉ. सरोजिनी बाबर यांचा लोकसाहित्याचा समृद्ध खजिना

prashant_c

तुळजाभवानी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद

Abhijeet Shinde

सोलापूर : पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत कडक संचारबंदी : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये ६५० जण कोरोनामुक्त, २६५ पॉझिटिव्ह तर ८ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!