तरुण भारत

दिल्लीतील कोरोना : सक्रिय रुग्ण संख्या 585 वर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील  24 तासात केवळ 29 नवे रुग्ण आढळून आले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 37 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

Advertisements


आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 35 हजार 720 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 10 हजार 095 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.8 % इतका आहे. तर आतापर्यंत 25,040 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


सद्य स्थितीत 585 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 30 लाख 43 हजार 445 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 45,892 आरटीपीसीआर टेस्ट आणि 12,610 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 388 झोन आहेत.

Related Stories

इंदोरमध्ये दुर्घटनेत 6 मित्रांचा मृत्यू

Patil_p

संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी

Patil_p

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

datta jadhav

कोरोना युद्धासाठी एशियन बँकेचे भारताला1.5 अज्ब डॉलर्सचे कर्ज

Patil_p

शिवराज मंत्रिमंडळात ‘सिंधिया’ वरचढ

Patil_p

रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन ; पालकमंत्र्यांचा इशारा

pradnya p
error: Content is protected !!