तरुण भारत

राधानगरी धरण 75 टक्के भरले, 1425 क्युसेकने विसर्ग सुरु

स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधीच पूरस्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी/राधानगरी

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून धरण 75 टक्के भरले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांना पूर आला असून सर्वत्र पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पुराचे पाणी शेतात शिरले आहे. तर जनजीवन विस्कळीत झाले असून पडळी पिरळ दोन्ही पूलं पाण्याखाली गेली असून कारीवडे, राऊतवाडी, कासारवाडी, सावर्धन , कसबा तारळे ,दुर्गमानवड व वाड्या वस्त्या या गावांचा राधानगरीशी संपर्क तुटला आहे. आतापर्यत धरणातील चार स्वयंचलित दरवाजे खुले झालेनंतर या गावांचा संपर्क तुटत होता. मात्र अचानकपणे पाणी वाढल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळी सहापासून दुपारपर्यंत राधानगरी धरण परिसरात विक्रमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी सहापासून सायंकाळपर्यंत अवघ्या आठ तासात 212 मिलिमीटर इतका पाऊस झाला. धरणाची पाणी पातळी 335 फूट इतकी असून धरण 347 फूट इतक्या पातळीला पूर्ण क्षमतेने भरते. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास केवळ दहा फूट पाणी पातळी कमी आहे.

आज अखेर एकूण 1906 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सध्या खाजगी पॉवर हाऊस मधून 1425 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. धरण काठावरील लोकांनी सतर्क राहण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी विवेक सुतार यांनी वर्तवला आहे.

Related Stories

देशाचे संरक्षण केलेल्या सैनिकांबद्दल समाजात प्रचंड आदर – आमदार आबीटकर

Sumit Tambekar

सोनारवाडी ट्रॅक्टर अपघातात एक ठार; चार जखमी

Abhijeet Shinde

मातोश्री रमाबाई आंबेडकर सुतगिरणीच्या प्रशासक निवडीला स्थगिती

Abhijeet Shinde

…तर सांगरुळ ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार – ग्रामस्थ

Sumit Tambekar

जिल्हयात कोरोनाचा उद्रेक सुरूच

Abhijeet Shinde

‘ओपन’च्या शक्यतेने बाजार गेट बनला ‘हॉटस्पॉट’!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!