तरुण भारत

सुशील कुमारची ‘ती’ मागणी तिहार जेलने केली पूर्ण


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारनं काही दिवासापूर्वी टीव्हीची मागणी केली होती. आता त्याची ही मागणी तुरुंग प्रशासनाने मान्य केली आहे.

सुशील कुमारने तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही हवा असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. २ जुलैला त्याने ही मागणी केली होती. कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी माहिती होण्यासाठी टीव्ही हवा असल्याचं सुशील कुमारनं आपल्या अर्जात म्हटलं होतं. त्याने आपल्या वकिलांमार्फत हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला होता.

आम्ही सुशील कुमारच्या वॉर्डमधील कॉमन भागात टीव्ही लावण्याची अनुमती दिली आहे. त्याने टीव्हीवर ऑलिम्पिक बघण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे इतर कैद्यांसोबत तो टीव्ही बघू शकतो, असं दिल्ली तुरुंग प्रशासक संदीप गोयल यांनी सांगितलं आहे.

कुस्तीपटू म्हणून करिअर पुढेही सुरू ठेवण्यासाठी तुरुंगात आपल्याला कुस्तीपटूसाठीचा आहार मिळण्याची विनंती यापूर्वी सुशील कुमारने दिल्ली विशेष न्यायालयाकडे केली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावली होती

Advertisements

Related Stories

दिल्ली कॅपिटल्स मुसंडी मारणार की मुंबई इंडियन्स?

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

वर्षभरात महामार्ग टोलनाकामुक्त!

Amit Kulkarni

कोरोनाच्या प्रसाराला कुंभमेळा कारणीभूत नाही

Patil_p

आंध्रचा धुव्वा उडवित पंजाबचा पहिला विजय

Patil_p

चीनला डावलून अमेरिकेसोबत गेलात तर…

datta jadhav
error: Content is protected !!