तरुण भारत

गुरुपौर्णिमेचे महत्त्व

आज गुरुपौर्णिमा आहे. शिष्य गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यासाठी त्यांचा गौरव करण्याचा हा दिवस. आध्यात्मिकदृष्टय़ा गुरू हा भगवंताचा प्रतिनिधी असावयास हवा. कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे सर्व ज्ञानाचे स्रोत आहेत. म्हणून श्री शंकराचार्य “कृष्णम वंदे जगद्गुरूं’’ असा श्रीकृष्णांचा गौरव करतात. सर्व वेद हे भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केले आहेत, स्वतः श्रीकृष्ण भगवत गीतेमध्ये सांगतात, (भ. गी. 15.15) सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वेरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।। अर्थात “सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निसंदेह मी वेदान्ताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.’’ यासाठी अर्जुनसुद्धा भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाचा गौरव करताना म्हणतात, (भ. गी. 11.43) पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्। न त्वत्समो।़स्त्यभ्यधिकः कुतो।़न्यो लोकत्रये।़प्यप्रतिमप्रभाव।। अर्थात “तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात, तिचे आध्यात्मिक गुरू तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता! त्रैलोक्मयामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रे÷ कोण असू शकेल?’’

जगामध्ये दोन प्रकारचे ज्ञान आहे. एक आहे भौतिक ज्ञान, जे ज्ञान आपण आपल्या इंद्रियाने, बुद्धीने, आकलनाने, प्रयत्नाने समजू शकतो आणि दुसरे आहे आध्यात्मिक ज्ञान जे आपल्या इंद्रियाच्या, बुद्धीच्या आणि आकलनाच्या पलीकडे आहे. हे आध्यात्मिक ज्ञान अतिसूक्ष्म आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे हय़ा जगातील ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण सरकारमान्य शाळेतील, सरकारमान्य विषयांचा, सरकारमान्य शिक्षकाद्वारे शिकविलेले ज्ञान शिकतो आणि त्याचा आपला जीवन जगण्यासाठी उपयोग करतो. पण हे ज्ञान आपले खरे प्रश्न सोडवू शकत नाही. उदाहरणार्थ आपला जन्म का व कशासाठी झाला? जीवनात कायम संघर्ष व दुःख आपल्याला नको असतानाही का येते? चांगल्या माणसाला वाईट दिवस का अनुभवावे लागतात? वाईट वृत्तीचा, भ्रष्टाचारी व्यक्तीही आनंदाने कसा काय जगू शकतो? हय़ा सृष्टीची निर्मिती कुणी आणि कशासाठी केली? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारंवार जन्म, आजारपण, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू इच्छा नसतानाही का स्वीकारावे लागतात? हय़ा अवाढव्य सृष्टीचे संचलन कोण व कसे करतो? वास्तविक पाहता हय़ा प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी मनुष्य जन्म आहे. हय़ासाठी आध्यात्मिक ज्ञान हे महत्त्वाचे आहे.

Advertisements

हे आध्यात्मिक ज्ञान परिपूर्ण व्यक्तीकडूनच प्राप्त केले पाहिजे. कारण हय़ा जगात जन्म घेणारा व्यक्ती चार दोषाने युक्त आहे. पहिले म्हणजे आपण सर्व जण भ्रमात आहोत, आपण कोण आहोत? याचीच आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे दुसरा दोष येतो जे काही आपण करतो ते चुकीचे असते, त्यातून तिसरा दोष येतो आपण जे करतो ते चूक असते आणि तेच बरोबर आहे असे समजून आपण वागतो. त्यामुळे आपली फसवणूक होते आणि दुसऱयांचीही आपण फसवणूक करतो, आणि चौथा दोष आहे आपली इंद्रिये ही अपूर्ण आहेत. जसे आपण ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राध्यापक, अभ्यासक्रम आणि शिक्षण संस्था निवडतो तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते. त्याचप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानही गुरू, शास्त्र आणि संप्रदाय यांच्याद्वारे प्राप्त होते.

व्यासदेवांनी हे परिपूर्ण ज्ञान जगाला दिले. त्यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला म्हणून या दिवसाला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. व्यासदेवांच्या परंपरेमध्ये जो येतो तोच हे ज्ञान जसे आहे तसे देऊ शकतो. म्हणून ज्या आसनावर गुरू बसतात त्याला ‘व्यासासन’ अथवा ‘व्यासपीठ’ म्हणतात. आजकाल हा शब्द कोणासाठीही वापरला जातो. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीचे कर्तव्य असते की तो स्वतःचे असे कोणतेही मत मांडत नाही. त्यांनी जे व्यासांपासून परंपरेतून चालत आलेल्या ज्ञानाचे स्वानुभवातून लोकांना मार्गदर्शन करणे अपेक्षित असते. म्हणून त्याला ‘प्रवचन’ असेही म्हणतात. भगवत गीतेमध्ये सांगितले आहे, “एवं परंपरा प्राप्तम’’ हे आध्यात्मिक ज्ञान श्रीकृष्णाच्या परंपरेतून आलेल्या व्यक्तीकडूनच प्राप्त करावे आणि ते ज्ञान प्राप्त करण्याची पद्धतही स्वतः श्रीकृष्णच सांगत आहेत (भ. गी. 4.34) तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।। अर्थात “आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, त्यांनी तत्व जाणले असते.’’ गुरुशिष्य परंपरेच्या तत्वाचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरू बनू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण हे आद्य आध्यात्मिक गुरू आहेत, व्यासदेव हे त्यांचेच अवतार आहेत आणि या गुरुशिष्य परंपरेतील व्यक्तीच भगवंताचा संदेश यथार्थ रूपात अनुभव घेऊन पुढे प्रदान करू शकतो.

आजकाल गुरू कशासाठी स्वीकारावा? याची सामान्य लोकांना कल्पनाच नाही. म्हणून दांभिक, भोंदू व्यक्तीला अज्ञानाने स्वतःचा काहीतरी भौतिक फायदा व्हावा किंवा काहीतरी चमत्कार करून दाखवितो म्हणून, अथवा सामाजिक कार्य करतो इत्यादी कारणास्तव गुरू म्हणून स्वीकार करतात. काही लोक स्वतःलाच कृष्ण समजून आपल्या शिष्यांना गोपी समजून रासलीला करतात. अगदी गांजा, चिरूट, सिगारेट ओढणारे, दारू पिणारे व्यक्तीसुद्धा गुरू म्हणून मिरवतात. अशा ढोंगी लोकांचे बिंग फोडताना तुकाराम महाराज म्हणतात,

“ऐसे संत झाले कळी। तोंडी तमाखूची नळी।।1।।

स्नानसंध्या बुडविली। पुढे भांग ओढविली।।2।।

भांगभुर्का हे साधन। पची पडे मद्यपान।।3।।

तुका म्हणे अवघे ढोंग। तेथे कैचा पांडुरंग।।4।।

अर्थात, “सर्व काळ तंबाखू भरून गुडगुडी (चिरूट) ओढणारे संत सध्या खूप झाले आहेत, हा कलियुगाचा महिमा आहे. स्नानसंध्याही आचार बुडवून त्यांनी भांग ओढण्याची कला आत्मसात केली आहे. भांग वाटून पिणे, तंबाखू खाणे, दारू पिणे हीच या लोकांची साधना असते. हे सर्व ढोंगी लोक आहेत, त्यांच्या ठिकाणी पांडुरंग कसा असेल?’’ गुरू कोण व कशासाठी स्वीकारला पाहिजे? याबद्दल भागवत या ग्रंथामध्ये सांगितले आहे, (श्री भा. (11.3.21) तस्माद् गुरूं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम्। शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्युपशमाश्रयम्।। अर्थात “खऱया सुखाच्या प्राप्तीची इच्छा असणाऱया मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जावे आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांचा आश्रय स्वीकारावा. सखोल विचारांती वेदाचे ज्ञान असलेले आणि इतरांनाही ते ज्ञान प्रदान करण्याचे सामर्थ्य बाळगणे, हे एका प्रामाणिक गुरुच्या योग्यतेचे लक्षण आहे. अशा प्रामाणिक गुरुचा आश्रय घेऊन त्याचा गौरव करून भगवतसेवेमध्ये दृढ होण्याचा संकल्प करण्याचा आजचा हा पवित्र दिवस.

Related Stories

स्वराज्य मंदिराचा पाया घालणारे ‘लोकमान्य’

Patil_p

कृषी व्यवस्थेच्या विकासाचे प्रारुप

Patil_p

विराटसेनेचा ‘पंगा’

Patil_p

कितवी तरी लाट

Patil_p

नाते आकार घेताना…2

Patil_p

बाल मनावर परिणाम

Patil_p
error: Content is protected !!