तरुण भारत

हावेरी कर्नाटक येथील दोन युवकांना मोबाईल चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी केली अटक

पेडणे  / प्रतिनिधी

हावेरी कर्नाटक येथील दोन युवकांना मोबाईल चोरी प्रकरणी पेडणे पोलिसांनी  केली अटक.

Advertisements

  पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या  माहितीनुसार पेडणे पोलीस स्थानकात महाखाजन   धारगळ येथील  महादेव यल्लप्पा कौर यांनी पेडणे पोलीस स्थानकात तक्रार दिली कि आपण धारगळ येथे बसस्टाॕपवर  थांबलो असताना एक मोटरसायल आपणाजवळ आली व थांबली .व त्यावर दोन युवाक होते. त्यांनी आपणास बेळगाव जाण्याचा रस्ता विचारला. याच दरम्यान   मागे बसलेल्या युवकाने माझा मोबाईल हिसकावून ते पञादेवी मार्गे  प्रसार झाले. अशी तक्रार दिली.याच दरम्यान गोव्याच्या विविध भागात मोबाईल हिसकावून चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पेडणे  पोलिसांना कंट्रोल रुम मधून मिळाली . त्यानंतर पेडणे पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हा नोंद केला.

  सदर मोबाईल चोरटे हे पञादेवी मार्गे  गेल्याने पेडणे निरीक्षक जिवबा दळवी यांनी बांदा पोलीस निरीक्षक तसेच सावंतवाडी पोलिस निरीक्षकांना यांची माहिती दिली.

  या दरम्यान सदर मोबाईल चोरटय़ांनी तशाच प्रकारे सावंतवाडी येथे मोबाईल  हिसकावून  चोरी केल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्र  पोलिसांनी गाडीची माहिती हावरे पोलिसांना दिली.त्यानुसार  सुदिप कन्नाप्पा हावेरी वय 19 वर्षे राहणारा नागेंद्रमठ्ठी हावेरी कर्नाटक व श्रीराज हुसेनसाब मोटेबेनर वय 19 राहणारा नागेंद्रमठ्ठी हावेरी कर्नाटक या दोघांना ताब्याता घेतले.

  पेडणे निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष वायंगणकर, उपनिरीक्षक संजित कानोळकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर,  अर्जुन कळंगुटकर, स्वप्नलि  शिरोडकर, सागर खोर्जुवेकर, संदेश वरक, वरक पेडणेकर यांनी ही कारवाई करत मोबाईल चोरटय़ांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करत त्यांना अटक केली.

Related Stories

कदंब कंत्राटी कामगारांचा आंदोलन सुरुच

Patil_p

गोव्याचे वीज दर देशात सर्वांत कमी

Omkar B

प्रमुख महिला प्रकल्पांना शशिकलाताईंचे नाव लवकरच देण्यात येणार

Patil_p

गेल्या पाच वर्षांत ६० टक्के आमदारांनी पक्षांतर करत गोमंतकियांना फसवले

Sumit Tambekar

मडगाव पालिका कर्मचाऱयांचा बोनस प्रश्न चिघळला

Amit Kulkarni

टॅक्सी मीटर प्रकरणी याचिका निकालात

Amit Kulkarni
error: Content is protected !!