तरुण भारत

सांगली जिल्हा पूरस्थिती Live : अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीच लाख क्युसेस

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे गुरूवारच्या रात्री पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे रात्रभर नदीकाठची गावच्या-गावं रातोरात मोकळी होऊ लागली आहेत.

सांगली जिल्हा Live अपडेट..

Advertisements
  • सांगली जिल्ह्यात दुपारपर्यंत 25 रस्ते पाण्याखाली

Video सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी मिरज कृष्णा घाट परिसराची केली पाहणी

●अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीचलाख क्युसेस

अलमट्टी धरणाचा विसर्ग अडीच लाख क्युसेस करणेतआला .सकाळी दहा पासून तो दोन लाख क्युसेस होता. महाराष्ट्र शासनाने तो वाढवा अशी विनंती केली होती. या पाश्वमूमीवर दुपारी विसर्ग वाढवून अडीच लाख करण्यात आला.

●कोयना, महाबळेश्वर परिसरात पाऊस किंचीत मंदावला

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे, मिरज तालुक्यातील डिग्रज मध्ये स्थलांतरास सुरवात
कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज यांना जोडणारा बंधारा आणि नवीन पूल दोन्हीही पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला

वाळवा तालुक्यातील बहे पुल वाहतुकीसाठी बंद
बोरगाव, मसूचीवाडी, जुनेखेड, वाळवा, बहे, तांबवे, गौंडवाडी, साटपेवाडी यासह अन्य गावात पाणी शिरल्याने लोकांची स्थलांतराची तयारी सूरू
भरतवाडीचा संपर्क तुटला, कणेगावातही शिरले पाणी,कणेगावातील शेकडो एकर पिके पाण्याखाली
मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीत शिरले पाणी, पाणी पातळी 50 फुटांवर, घाट परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

Video कोयना धरणाचे दरवाजे उघडले

Video सांगलीतील पुरस्थिती, जलसंपदामंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  • वाळवा तालुक्यातील बोरगाव बंधारा व ताकारी पुल, बहे बांधारा पाण्याखाली गेले आहेत त्याचबरोबर नदीकाठची असणारी गावे खरातवाडी, हुबालवाडी, फार्णेवाडी, बनेवाडी, गौडवाडी, साटपेवाडी, मसुचीवाडी या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला असून या गावातील लोकांनी गुरुवार रात्रीपासून स्थलांतर करण्यास सुरुवात केली
मौजे डिग्रज मधील नागरिक व जनावरे यांचे विस्थापन सुरू आहे.
मिरज कृष्णाघाटावरील जनावरे सुरक्षित स्थळी हळवली
  • अलमट्टी धरण शुक्रवार 23 जुलै सकाळी दहा वाजता विसर्ग दोन लाख क्युसेकने सुरू
  • सांगलीला महापूराचा धोका पाणी पातळी 50 होणार कोयनेतून मोठा विसर्ग

Related Stories

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

Abhijeet Shinde

सांगली : वसगडेत अज्ञात कबरीमुळे खळबळ

Abhijeet Shinde

महाराष्ट्र धनगर समाज महासंघाची २ डिसेंबरला धुळ्यात राज्यव्यापी बैठक

Abhijeet Shinde

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

Abhijeet Shinde

जिल्ह्यात एकूण २८६ पॉझिटिव्ह, शाहूवाडी सर्वाधिक ९५

Abhijeet Shinde

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav
error: Content is protected !!