तरुण भारत

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

वशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे चिपळुणात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. वशिष्ठी नदीला महापूर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर कोकण रेल्वेने आपली वाहतूक बंद ठेवल्याची माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली आहे.जो पर्यंत धोक्याच्या पातळीखाली पाणी येत नाही तोपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानकादरम्यान वशिष्ठी नदीवर पूल आहे. या पुलावरून सद्या रेलगाडय़ा सोडणे धोक्याचे बनले आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने खरबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने आपली वाहतूक बंद ठेवली आहे. काही गाडय़ा पर्यायी मार्गाने सोडण्यात आलेल्या आहेत. नदीने धोक्याची पातळी ओलांडली की रेलगाडय़ा बंद करणे हा रेल्वेचा नियम आहे व त्यानुसार ही वाहतूक बंद करण्यात आल्याचे घाटगे म्हणाले.

रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा पुढील प्रमाणे ः 1) टेन क्रमांक 01152 मडगाव – मुंबई सीएसएमटी ‘जनशताब्दी’ स्पेशल दिनांक 22/07/2021 रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. 2) ट्रेन क्रमांक 02119 सीएसएमटी.  – करमळी तेजस स्पेशल दि. 22/07/2011 रोजी रोहा येथून रद्द करण्यात आलेली आहे. 3) टेन क्रमांक 02120 करमळी – सीएसएमटी तेजस स्पेशल दि. 22/07/2021 पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे.

पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या गाडय़ा

1) टेन क्रमांक 02618 निझामुद्दिन – एर्नाकुलम 21/07/2012 ची स्पशेल रेलगाडी मनमाड, पुणे, मिरज, लोंढा, मडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. 2) टेन क्रमांक 06338 एर्नाकुलम – ओखा द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक 21/07/2012 रोजी मडगाव जंक्शन, लोंडा जंक्शन, मिरज जंक्शन, कुर्डूवाडी जंक्शन, दौड जंक्शन, मनमाड जंक्शन, जळगाव, उधना जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

पुढील गाडय़ाचे नव्याने वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. 1) टेन क्र. 06345 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम मध्ये दैनिक विशेष यात्रा दि. 22/07/2012 रोजी पुन्हा शेडय़ूल करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक (टी.) दुपारी 2.40 वा. म्हणजे तीन तास उशिरा सुटणार आहे. कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱया सर्व प्रवाशांनी रद्द करण्यात आलेल्या गाडय़ा तसेच वळविण्यात आलेल्या गाडय़ाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Related Stories

मडगावात ‘बीग जी’ वर धाड, अवैध मद्य जप्त

Amit Kulkarni

रुग्णवाहिका उपलब्ध करूनही परवानगीविना पडून

Amit Kulkarni

पेड -मडगाव येथे दोघांवर जीवघेणा हल्ला

Amit Kulkarni

मडगावः पुनम पांडेविरुद्धच्या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता

Patil_p

सरकारला केवळ विकासाचा ध्यास

Patil_p

गोमेकॉचे माजी डिन खिवराज कामत यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!