तरुण भारत

सांगली : मिरजेत कारवाईच्या इशाऱ्याने पुन्हा शटर डाऊन

पोलीस रस्त्यावर, मात्र आमदार खाडेंच्या मध्यस्तीनंतर हायस्कुल रोडवरील दुकाने उघडली

प्रतिनिधी / मिरज

Advertisements

प्रशासनाने परवानगी नाकारल्यास मिरज शहरातील सर्व व्यापारी दुकाने उघडतील असा इशारा भाजपने दिला होता. शुक्रवारी आमदार सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांची रॅली काढून दुकाने उघडण्यात आली. मात्र, काही वेळातच पोलिसांकडून कारवाई सुरू झाल्याने उघडलेल्या दुकानांचे पुन्हा शटर डाऊन झाले.

पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करून दुकाने बंद करण्यास सांगितले. मात्र, आमदार सुरेश खाडे यांनी मध्यस्ती घेऊन व्यापाऱ्यांची बाजू मांडली. त्यानंतर हायस्कुल रोडवरील काही दुकाने उघडण्यात आली. एकीकडे लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. मात्र, दुसरीकडे प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याने वादवादीचे प्रकार घडले.

Related Stories

सांगली : जनावरांना घातला दुधाचा अभिषेक, आटपाडी तालुक्यात आंदोलन

Abhijeet Shinde

बांबू लागवड मार्गदर्शनासाठी पाशा पटेल, संजीव करपे येणार सांगलीत

Abhijeet Shinde

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी राज्यासह केंद्रानेही मदत करावी

Abhijeet Shinde

शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा परिषदमध्ये 25 हजाराची लाच घेताना लिपिक जाळ्यात

Abhijeet Shinde

मिरजेत 168 मंडळांचा अंबाबामातेला निरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!