तरुण भारत

Porn Film Case : राज कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेस मॅन राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांच्या निर्मितीप्रकरणामध्ये 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर राज कुंद्रा याला आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत 7 दिवसांची म्हणजेच 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे.

Advertisements


यासोबतच अश्लील फिल्म बनवून विकल्या आणि मिळालेल्या पैशातून बेटींग केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या दोन बँक अकाउंटचीही पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन थॉर्प यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.


दरम्यान, या पॉर्नोग्राफीमधून मिळालेला पैसा राजने ऑनलाइन सट्टेबाजीसाठी लावला असल्याचा पोलिसांना संशय आहे. राज कुंद्राच्या येस बँके आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यांतून झालेल्या व्यवहारांची चौकशी पोलिसांना करायची आहे. त्यामुळे न्यायालायने या दोघांची पोलीस कोठडी वाढवली असून त्यांची रवानगी पुन्हा एकदा भायखळा कारागृहात झाली आहे.

Related Stories

फुलवा खामकर रमली आठवणींच्या खजिन्यात!

Patil_p

‘माई स्पेशल’ चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस

Patil_p

अमेरिका : मॉडर्नाच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

datta jadhav

काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांचा भाजपमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

सोलापुरात शहरात 25 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

चिंता वाढली : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,74,761 वर

Rohan_P
error: Content is protected !!