तरुण भारत

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या मालेगावच्या भाविकांवर काळाचा घाला

चार जण जागीच ठार, तीन जण गंभीर जखमी

प्रतिनिधी / उस्मानाबाद

Advertisements

वाशी तालुक्यातील तेरखेड्याजवळ चाक पंक्चर झाले म्हणून उभारलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला आयसर टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार ठार आणि तीन जखमी झाले आहेत. तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या मालेगावच्या भाविकांवर शुक्रवारी पहाटे काळाने हा घाला घातला.

तिरुपतीला दर्शनासाठी जाणारे भाविक ज्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्यून प्रवास करत होते. तो टेम्पो ट्रॅव्हलर पंक्चर झाला होता. त्यामुळे तेरखेडा येथील पांडुरंग हॉटेलजवळ टेम्पो उभा करण्यात आला होता. यावेळी काहीजण गाडीतच बसले होते. दरम्यान याच मार्गान उस्मानाबादकडे जाणाऱ्या आयसरने या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये टेम्पो ट्रॅव्हरचा चुराडा झाला आहे.

या अपघातात वाहनातील भाविक शरद विठ्ठलराव देवरे (४४, रा.वडगाव, ता. मालेगाव), विलास महादू बच्छाव (४६, रा. सायने बु. ता. मालेगाव), जगदीश चंद्रकांत दरेकर (४५, रा.दरेगाव, ता. मालेगाव) व सतीश दादाजी सूर्यवंशी (५०, रा. दरेगाव, ता. मालेगाव) हे चौघे जागीच ठार झाले. तर संजय बाजीराव सावंत (३८), भरत ग्यानदेव पगार (४७, दोघेही रा. सायने बु.) व गोकुळ हिरामण शेवाळे (३८, रा. लोणवाडे, ता. मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ सोलापूरला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर धडक दिलेल्या टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याविरुद्ध येरमाळा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

मराठा एकीकरण समिती कार्यकर्त्यांना धमकी, संमेलनावर बंदी घालणाऱयांचा निषेध

Abhijeet Shinde

बार्शी शहरात दोन तर वैरागमध्ये सपडला एक कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात ७०, ग्रामीणमध्ये ३४० नवे रुग्ण

Abhijeet Shinde

विनापरवाना वृक्ष तोड; भुसारे,रेळेकर यांना कारणे दाखवा नोटीस

Abhijeet Shinde

सोलापूर : निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, ओढ्यातून शेतकरी गेला वाहून

Abhijeet Shinde

कोर्टाच्या आदेशाने गाढवं निघाली उटीला…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!