तरुण भारत

सांगली : पावसामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या बंद

काही वाहतूक दुसऱ्या मार्गावरून, सांगली एसटी विभागाने दिली माहिती

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

महापुराच्या पार्शवभूमीवर सांगली एसटी विभागातील एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. वाढत्या पुराच्या पाण्यामुळे अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे सांगलीहून इतर गावी जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तर काही फेऱ्या इतर मार्गावरुन सुरु असल्याची माहिती सांगली एसटी विभागातून देण्यात आली.

प्रवाशांना सोयिस्कर ठरणारी एसटी सेवा महापुराच्या पाण्यामुळे कोलमंडली आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावरील शिरोली पूलावर पाणी आल्याने सध्या एसटीची वाहतूक नागाव मार्गे वळवण्यात आली आहे. तर सांगलीहून नव्या बायपासमार्गे कोल्हापूरकडे जाताना उदगाव येथील ओढ्यामधून पाणी आल्याने हा मार्गही बंद आहे. सध्या जयसिंगपूरमार्गे वाहतूक सुरु आहे. तसेच इस्लामपूरकडे जाणारी वाहतूक नव्या बायपासवर पाणी आल्याने कर्नाळ-माधवनगर रोडवरुन एसटी वाहतूक सुरु आहे.

आमणापूर पूल पाण्याखाली गेल्याने भिलवडी पर्यंतच वाहतूक सुरु आहे. तेथून पुढे आमणापूरला जाणाऱ्या फेया बंद करण्यात आल्या असून, आमणापूर व बुर्लीसाठी पलूसमार्गे वाहतूक सुरु आहे तर अंकलखोप-वाळवा हा ही वाहतूकीचा मार्ग बंद करण्यात आल्याने येथील फेऱ्या बंद आहेत. तसेच मौजे डिग्रज मार्गावरील म्हसोबा पूलावर पाणी आल्याने या मार्गावरील फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. काही फेऱ्या वाहतूक सुरळीत होईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या असून, काही फेऱ्या इतर मार्गावरुन सुरु आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकातून योग्य ती माहिती घेवूनच प्रवास करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कागल तालुक्यातील व्हनाळीच्या सरपंचपदी छाया सुतार

triratna

पुरग्रस्त नागरिक करतायेत पडक्या घरातूनच कोरोनाशी मुकाबला

triratna

वर्ल्ड मराठा ऑगनायझेनतर्फे आज कोल्हापुरात रक्तदान शिबिर

triratna

पूर्ववैमनस्यातून दुचाकी पेटवली, दोघांना अटक

triratna

कोल्हापूर जिल्हय़ात 998 पॉझिटिव्ह, 21 बळी

triratna

छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी दिलीपराव पाटील

triratna
error: Content is protected !!