तरुण भारत

गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर

ऑनलाईन टीम / पुणे :

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त की जय… च्या जयघोषाने बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. मंदिर बंद असल्याने केवळ ब्रह्मवृंद आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत आकर्षक पुष्परचना करण्यात आली. सलग दुस-या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवात भाविकांनी मंदिराबाहेरुनच श्री दत्त महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. 

Advertisements


बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२३ व्या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात धार्मिक विधी आयोजित करण्यात आले. माध्यान्य आरती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या हस्ते झाली. संपूर्ण मानवजातीवरचे कोरोना संकट त्वरीत नष्ट होऊन जग भयमुक्त होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी श्री दत्त महाराजांचरणी केली. माजी खासदार अशोकराव मोहोळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते.


शुक्रवारी पहाटे ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर व कुटुंबियांच्या हस्ते रुद्राभिषेक झाला. हॉटेल व्यावसायिक विशाल शहा, अनिता शहा व कुटुंबिय, तिरुमला देवस्थानचे रिषी पांडे व कुटुंबियांच्या हस्ते सकाळी आणि माधुरी जाधव व कुटुंबियांच्या हस्ते दुपारी श्री दत्त याग पार पडला. श्री दत्त महाराजांच्या मूर्तीवर विविध सुवर्णालंकार व पुष्पालंकार देखील घालण्यात आले होते. महाप्रसाद रद्द करीत गुडदाणी पाकिट, मिल्कशेक आणि वेफर्स पाकिट भाविकांना मंदिराबाहेर देण्यात आले.

Related Stories

किल्ले राजगडावर शिवप्रेमींतर्फे पालखी सोहळा जल्लोषात साजरा

Rohan_P

कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘मास्टर ब्लास्टर’चेही योगदान!

Rohan_P

नव्याने शोध लागलेल्या कोळ्याच्या प्रजातीला 26/11 हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव

Rohan_P

केरळमधील श्वान करतोय जगाची भ्रमंती

Amit Kulkarni

दिग्गज आणि तरुणाईने केले ‘वंचितांचे बोरन्हाण’

prashant_c

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

Rohan_P
error: Content is protected !!