तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाड दौऱ्यावर; दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 44 लोक ठार झाले आहेत. दरडीखाली अख्खे गावच नेस्तानाबूत झाले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. 

Advertisements


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी 3.20 वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासानाकडून घटनेची माहिती घेणार आहेत. 

Related Stories

महिलांवरील अत्याचार, बंद मंदिरांच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्रात आंदोलन

Rohan_P

सातारा पालिकेने ‘कागदी’ घोडी नाचवली

Patil_p

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

triratna

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरासह मालमत्तांवर सीबीआयचा छापा

Rohan_P

जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात 162 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1922 वर

Rohan_P

भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ; रोहिणी खडसेंचा सवाल

triratna
error: Content is protected !!