तरुण भारत

दूधसागरनजीक रेल्वेवर कोसळली दरड

‘गोवा एक्स्प्रेस’ कॅसलरॉकमध्येच रोखली

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने शुक्रवारी पहाटे लोंढा- मडगाव रेल्वेमार्गावर दरड कोसळली. मंगळूर-मुंबई एक्स्प्रेसवर दरड कोसळली परंतु सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यामुळे वास्कोच्या दिशेने जाणारी ‘गोवा एक्स्प्रेस’ कॅसलरॉकमध्येच रोखण्यात आली. दुपारनंतरही पावसाचे प्रमाण कमी होत नसल्याने एक्स्प्रेस बेळगावला माघारी आणण्यात आली.

बेळगावमध्ये आल्यानंतर प्रवाशांनी बसने तसेच इतर खासगी वाहनांनी परतीचा प्रवास केला तर इतरांनी येथेच राहणे पसंत केले.

जोरदार पावसाने पश्चिम घाटातील दुधसागरनजीक दरड कोसळय़ाची घटना शुक्रवारी पहाटे 6 च्या सुमारास घडली. मंगळूर-मुंबई या रेल्वेवर दरड कोसळली. यामुळे काही डब्यांमध्ये चिखल शिरला. यामध्ये कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती नैर्त्रुत्य रेल्वेने दिली आहे. सुमारे 500 घनमीटर परिसरात ही दरड कोसळली. डोंगरावरील माती, दगड रेल्वेरूळावर आल्याने मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला.

तात्काळ हुबळी येथून अपघात नियंत्रण विभाग घटनास्थळी दाखल झाला. 2 पोकलेन, 15 ट्रकमन व 50 हून अधिक कर्मचारी दरड हटविण्याचे काम करत होते. परंतु धुवाधार पावसाने दरड हटविण्याच्या कामामध्ये व्यत्यय येत होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

गोवा एक्स्प्रेस अर्ध्या वाटेवरून परतली

हजरत निजामुद्दीन- वास्को (रेल्वे क्र. 02780) ही रेल्वे गोव्याच्या दिशेने जात असताना कॅसलरॉकनजीक रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने काही काळासाठी पहाटे रोखण्यात आली. त्यानंतर रेल्वेमार्ग सुरळीत होण्याची प्रतीक्षा करण्यात आली मात्र पावसाच्या सततच्या माऱयामुळे पुढील प्रवास अशक्मय असल्यामुळे मागे फिरविण्यात आली. सकाळी 8 च्या सुमारास लोंढा येथे प्रवाशांच्या नाष्टय़ाची सोय करण्यात आली. त्यांनतर ती सायंकाळी 6 च्या दरम्यान बेळगावला माघारी आली. यामध्ये 887 प्रवासी अडकले होते.

मंगळूर- मुंबई एक्सप्रेस पुन्हा माघारी

मंगळूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसटी, मुंबई) ही रेल्वे कोकणरेल्वे मार्गे धावते. परंतु कोकण रेल्वे मार्गावर पाणी आल्याने ती लोंढा, मिरज, पुणेमार्गे गुरुवारी रात्री वळविण्यात आली. परंतु दूधसागरनजीक दरड कोसळल्याने रेल्वे माघारी मडगावला घेवून जाण्यात आली. यामध्ये 345 प्रवासी होते त्यांना नाष्टा रेल्वे विभागातर्फे पुरविण्यात आला.

अनिश हेगडे (जनसंपर्क अधिकारी, नैऋत्य रेल्वे)

दूधसागरनजीक दरड कोसळल्याने दोन एक्स्प्रेस अडकून पडल्या. एक रेल्वे मडगाव तर दुसरी बेळगावला माघारी घेवून जाण्यात आली. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नैर्त्रुत्य रेल्वेने केली. अनेक नद्यांनी धोक्मयाची पातळी ओलांडली असल्याने काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच दरड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू असून ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. 

या रेल्वे झाल्या रद्द

वास्को – हजरत निजामुद्दीन (गोवा एक्स्प्रेस)

हुबळी -दादर (मुंबई एक्स्प्रेस)

मिरज – बेंगळूर (चन्नम्मा एक्स्प्रेस)

बेळगाव – बेंगळूर (बेळगाव एक्स्पेस)

तिरूपती – कोल्हापूर (हरिप्रिया एक्स्प्रेस)

या रेल्वेच्या मार्गात बदल

तिरूवेनवेल्ली – दादर (हुबळी, गदग, विजापूरमार्गे)

कोल्हापूर – तिरूपती (मिरज, कुर्डुवाडी, गदगमार्गे)

तिरूवेनवेल्ली – गांधी धाम (हुबळी, गदग, विजापूरमार्गे)

जोधपूर – बेंगळूर (दौड, वाडी, धर्मावरममार्गे)

बेंगळूर – अजमेर (गदग, दौंड, पुणे)

Related Stories

न्यायालयाच्या आवारात बेशिस्तपणे पार्किंग

Amit Kulkarni

गुजरात नवरात्रोत्सव मंडळातर्फे अन्नदान

Amit Kulkarni

महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज महामोर्चा

Amit Kulkarni

पंधराव्या वित्त आयोग अनुदानात यंदा कपात

Amit Kulkarni

अंगडी तांत्रिक महाविद्यालयात कार्यशाळा

Patil_p

कारदगा येथे पत्रकारांचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!