तरुण भारत

तालिबानसोबत युद्धाची मोठी तयारी

ताजिकिस्तानात देशाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास- वाढत्या दहशतीदरम्यान सरकारने उचलले पाऊल

वृत्तसंस्था/ दुशांबे

Advertisements

अफगाणिस्तानात तालिबानच्या वाढत्या दहशतीदरम्यान शेजारी देश ताजिकिस्तानने देशाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास केला आहे. ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली राखमोन यांच्या आदेशावर 2.30 सैनिक असलेल्या सैन्याला सतर्क करण्यात आले आहे. तसेच अफगाणिस्तानच्या सीमेवर 20 हजार अतिरिक्त सैनिकांना तैनात करण्यात आले आहे. युद्धाभ्यासात पायदळ, वायुदल आणि तोफखान्याचा समावेश होता. संपूर्ण युद्धाभ्यासाचे थेट प्रसारण देखील करण्यात आले ओ.

अफगाणिस्तानची स्थिती अत्यंत जटिल आणि अस्थिर झाली आहे. संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्याने सज्ज रहावे असे अध्यक्ष राखमोन यांनी म्हटले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या कंधार प्रांतात 100 हून अधिक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. स्पिन बोल्डक जिल्हय़ात तालिबानने विध्वंस घडवून आणला आहे. पण तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेकडून एअर स्ट्राक

अमेरिकेने तालिबानच्या तळांवर 6-7 एअर स्ट्राइक केले आहे. अफगाण सैन्याला मदत पुरविण्यासाठी हवाई हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. अमेरिकेची कारवाई दोहा कराराचे उल्लंघन करणारी आहे, आम्ही गप्प बसणार नाही असे तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

..तोपर्यंत नाही होणार शांतता

अशरफ गनी यांचे सरकार पायउतार होत संघर्षात सामील सर्व घटकांना मान्य असणारे सरकार सत्तेवर येईपर्यंत तालिबान शस्त्रास्त्रs खाली ठेवणर नाही. सत्तेवर एकाधिकारात विश्वास ठेवत नसल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे.

सैन्याच्या कारवाईत 30 तालिबानी दहशतवादी ठार

अफगाणिस्तानने तालिबानवर मोठा एअरस्ट्राइक केला आहे. दोन प्रांतांमध्ये अफगाणिस्तान वायुदलाच्या हवाई हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 17 दहशतवादी जखमी झाले आहेत. उत्तर जज्जान प्रांताची राजधानी शिबरघनच्या भागात लढाऊ विमानांकडून दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.

दक्षिण हेलमंड प्रांताची राजधानी लष्कर गाहच्या बाहेरील भागात वायुदलाच्या कारवाईत 14 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांची तीन वाहने, 6 दुचाकी, दोन बंकर आणि शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. अफगाणिस्तानात हिंसेत वाढ होत असताना हे हवाईहल्ले करण्यात आले आहे. अमेरिका तसेच नाटो सैन्य माघारी परतल्यापासून तालिबानकडून हिंसाचार सुरू आहे. अफगाणिस्तानच्या 419 जिल्हा केंद्रांपैकी निम्म्या ठिकाणी तालिबानचे नियंत्रण आहे.

Related Stories

जगभरात भारतीय वंशीयांचा डंका

Patil_p

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

Patil_p

तालिबानला पाकिस्तान पुरवतोय रसद

Patil_p

सदैव घरातून काम करण्याची अनुमती

Patil_p

समुद्रकिनारी पक्ष्याची दहशत

Patil_p

जर्मनीतील रुग्ण वाढले

Patil_p
error: Content is protected !!