तरुण भारत

पाक सीमेवर ड्रोनविरोधी यंत्रणेचे परीक्षण

पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांना देणारा प्रत्युत्तर

वृत्तसंस्था / जम्मू

Advertisements

ड्रोन हल्ल्यांच्या सातत्याने वाढणाऱया धोक्यांना सामारे जाण्यासाठी डीआरडीओकडून विकसित ड्रोनविरोधी प्रणालीचे लवकरच जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर परीक्षण होणार आहे. परीक्षणाच्या आधारावर ही प्रणाली तैनात करण्यासंबंधी बीएसएफ अंतिम निर्णय घेणार आहे. हे परीक्षण पुढील 15 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

डीआरडीओची वर्तमान ड्रोनविरोधी प्रणाली 4 किलोमीटरच्या कक्षेत उडत असलेल्या ड्रोनचा शोध लावणे, दोन किलोमीटरच्या कक्षेतील ड्रोनचे नेटवर्क जाम करणे आणि एक-दोन किलोमीटरच्या कक्षेत ड्रोन पाडविण्यास सक्षम आहे. याचदरम्यान सैन्याकडून पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी इलेक्ट्रो ऑप्टिक ड्रोन प्रणाली तैनात करण्यात आली आहे. ही प्रणाली सुमारे दीड किलोमीटरच्या कक्षेत शत्रूच्या ड्रोनचा शोध लावून त्याचे सिग्नल जाम करणे तसेच तो पाडविण्यास सक्षम आहे. या प्रणाली लेजर तंत्रज्ञानाचा वापर होतो.

बीएसएफने जम्मू प्रांतात कथुआपासून कानाचकपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमेवर काही विशेष ठिकाणांना ड्रोनविरोधी प्रणाली तैनात करण्यासाठी निवडले आहे. या ठिकाणी ड्रोनविरोधी यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचे परीक्षण होणार आहे. बीएसएफने याकरता डीआरडीओला विनंतीपत्र पाठविले आहे.

डीआरडीओकडून विकसित ड्रोनविरोधी यंत्रणेचे जम्मू-काश्मीरची भौगोलिक स्थिती तसेच बीएसएफ आणि अन्य सुरक्षा यंत्रणांयच आवश्यकतेनुसार टाइम ऑन ग्राउंड परीक्षण होणार आहे. हे परीक्षण यशस्वी ठरल्यास बीएसएफकडून त्याचा वापर होणार आहे. परीक्षणादरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्यानुसार सुधारणाही करण्यात येणार आहे.

डीआरडीओच्या ड्रोन यंत्रणेचे मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अमृतसरनजीक परीक्षण झाले आहे. पण एनएनसीकडून सध्या इस्रायल तसेच अमेरिकेकडून पुरविण्यात आलेल्या ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ड्रोनविरोधी यंत्रणा एकटय़ाने किंवा समुहात येणाऱया युएव्हीचा 10 सेकंदांमध्ये शोध घेत त्यांना लक्ष्य करण्यास सक्षम असावी अशी बीएसएफची मागणी आहे.

Related Stories

कमलनाथांवर काँग्रेस आमदार नाराज

Patil_p

राममंदिराची बांधणी ‘नागर’ शैलीत होणार

Patil_p

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Patil_p

स्थलांतरितांच्या ‘तिकिटा’वरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

Patil_p

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, 5 ठार

Patil_p
error: Content is protected !!