तरुण भारत

जम्मू-काश्मीरमध्ये सीबीआयचे छापे

शस्त्र परवाना घोटाळा – आयएएस शाहिद चौधरींवर संशय

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisements

सीबीआयने शस्त्र परवाना प्रकरणी शनिवारी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे आयएएस अधिकारी शाहिद इक्बाल चौधरी यांच्या निवासस्थानासह 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. 2019 मध्ये नेंद एका गुन्हय़ाप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. 2012-16 दरम्यान जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्हय़ांच्या आयुक्तांनी पैशांच्या बदल्यात बनावट आणि अवैध स्वरुपात शस्त्रपरवाने दिल्याचा आरोप आहे.

चौधरी हे 2009 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असून सध्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासकीय सचिवाच्या पदावर तैनात आहेत. कथुआ, राजौरी आणि उधमपूर या जिल्हय़ांमध्ये उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकांना बनावट नावावर शस्त्र परवाने वितरित करण्यात आल्याचा आरोप चौधरींवर आहे.

मागील वर्षी याप्रकरणी आयएएस अधिकारी राजीव रंजन समवेत दोन अधिकाऱयांना सीबीआयने अटक केली होती. रंजन आणि इतरत हुसैन रफीकी यांनी कुपवाडा जिल्हय़ाच्या आयुक्तपदी असताना कथितपणे अनेक अवैध परवाने वितरित केले होते. राजस्थान एटीएसने 2017 मध्ये या घोटाळय़ाचा खुलासा करत 50 हून अधिक आरोपींना अटक केली होती. सैनिकांच्या नावावर 3 हजारांहून अधिक परवाने देण्यात आले होते असे एटीएसने स्पष्ट केले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी याप्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयला सोपविली होती.

Related Stories

शेतकरी आंदोलनावर राज्यसभेत चर्चा

Patil_p

राम मंदिरासाठी सोन्या-चांदीचा मोठा ओघ

Patil_p

आसाममध्ये भूस्खलन; 20 जणांचा मृत्यू

datta jadhav

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

triratna

1 हजार महिलांकडून शिवतांडव पाठ

Patil_p

Patil_p
error: Content is protected !!