तरुण भारत

मुलांसाठी मॉडर्ना लसीला युरोपमध्ये मंजुरी

फायजरनंतर मंजुरी मिळविणारी दुसरी लस

वृत्तसंस्था/ ब्रसेल्स

Advertisements

जगात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. अशा स्थितीत अनेक देश युद्धपातळीवर लसीकरण करू पाहत आहेत. सद्यकाळात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लसीचे डोस देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांवर अद्याप विषाणूचा धोका घोंगावत आहे. युरोपीय महासंघाच्या वैद्यकीय यंत्रणेने 12-17 वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाच्या लसीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी युरोपियन मेडिसीन एजेन्सीने (ईएमए) मे महिन्यात फायजरला या वयोगटासाठी मंजुरी प्रदान केली होती.

12-17 वयोगटातील मुलांसाठी स्पाइकवॅक्स लसीचा वापर प्रौढांप्रमाणेच केला जाणार आहे. लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. दोन्ही डोसमधील अंतर 4 आठवडय़ांचे असणार असल्याचे ईएमएकडून सांगण्यात आले. 12-17 वयोगटातील 3,732 मुलांवर स्पाइकवॅक्सचे परीक्षण करण्यात आले होते. या परीक्षणाचे निष्कर्ष अत्यंत सकारात्मक मिळाले आहेत. सर्व मुलांच्या शरीरात चांगल्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्याचे सांगण्यात आले.

कमी वयाच्या मुलांवरही परीक्षण

तर फायजरने स्वतःच्या लसीचे परीक्षण 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवरही सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील अध्ययनात कमी संख्येत लहान मुलांना लसीचे वेगवेगळे डोस देण्यात येतील. याकरता फायजरने जगातील 4 देशांमध्ये 4,500 हून अधिक मुलांची निवड केली आहे.

अनेक कंपन्या प्रयत्नशील

चालू वर्षी मे महिन्यात ऍस्ट्राझेनेकाने 6-17 वयोगटातील मुलांवर ब्रिटनमध्ये अध्ययन सुरू केले होते. तर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनेही परीक्षण सुरू केले आहे. चीनच्या सिनोवॅकने 3 वर्षांपर्यंच्या मुलांवरही स्वतःची लस प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

भारताशी सहकार्य बळकट करणार

Patil_p

सँडविचकरता 128 किलोमीटरचा हेलिकॉप्टरने प्रवास

Patil_p

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन, पाकिस्तान विरोधात निदर्शने

datta jadhav

भारताची ‘हवा’ फारच खराब

Patil_p

तैवानमध्ये वाढले बेरोजगारीचे प्रमाण, कोरोनाचा परिणाम

Patil_p

इस्रायल : उच्चांकी रुग्ण

Patil_p
error: Content is protected !!