तरुण भारत

जिनपिंग यांचा दौरा, भारताकडून प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ शिलाँग

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शुक्रवारी अचानक अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेटचा दौरा केला होता. न्यिंगची शहराला त्यांनी भेट दिली होती. त्यांचा हा दौरा भारतासोबत सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान झाला आहे. 2013 मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिला तिबेट दौरा होता. जिनपिंग यांच्या दौऱयाला एकप्रकारे प्रत्युत्तर देणारे पाऊल भारत सरकारकडून उचलण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह शनिवारपासून दोन दिवसांच्या ईशान्येतील राज्यांच्या दौऱयावर गेले आहे.

Advertisements

शाह यांच्या दौऱयाचा प्रारंभ शिलांगमधून झाला आहे. जिनपिंग यांनी ज्या भागांना भेट दिली तेथून हवाईमार्गाने शिलाँगपर्यंतचे अंतर केवळ 462 किलोमीटर आहे. शाह या दौऱयात ईशान्येतील 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सीमा वादासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

ईशान्येतील राज्यांदरम्यान वाद

#tarun

ईशान्येतील राज्यांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. यात आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम सामील आहे.  आसामचा अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम आणि नागालँडसोबत सीमा वाद सुरू आहे.

जिनपिंग यांच्या दौऱयाचा अन्वयार्थ

चीन अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भागांमध्ये सैन्यसुविधांची निर्मिती करत आहे. अशा स्थितीत चिनी अध्यक्षांचा दौरा भारतासाठी एकप्रकारे इशारा असू शकतो. याचप्रकारे गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱयातून भारत प्रत्येक आव्हानासाठी सज्ज असून स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचा संदेश देण्यात आला आहे. चीनने तिबेटची राजधानी ल्हासा आणि न्यिंगची या शहराला जोडणारी बुलेट ट्रेन सेवा सुरू केली आहे.

दौऱयातील महत्त्वाच्या घडामोडी….

– तिबेट दौऱयादरम्यान जिनपिंग यांनी राजधानी ल्हासामध्ये डेपुंग मठ, बरखोर स्ट्रीट अणि पोटाला पॅलेस सारख्या प्रसिद्ध बौद्ध मठांना भेट दिली.

-ल्हासा शहरामधील पोटाला पॅलेसला बौद्ध धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरु दलाई लामा यांचे घर म्हटले जाते.

-स्वतःच्या या दौऱयातून जिनपिंग पुढील दलाई लामाच्या निवडीसाठी तिबेटच्या लोकांना स्वतःच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करत असावेत.

-ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱयात न्यांग नदीवरील पुलाचा दौरा जिनपिंग यांनी केला आहे. भारताचा या प्रकल्पाला विरोध आहे.

Related Stories

….तर 22 लाख जणांचा मृत्यू!

tarunbharat

ईजिप्तमध्ये रेल्वे टकरीत 32 ठार

Patil_p

भारतावरून झेपावले इम्रान यांचे विमान

Patil_p

तालिबानची जुलमी हुकुमशाही सुरू

Patil_p

इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; 4 जखमी

prashant_c

पॅकेजवरून राजकारण

Patil_p
error: Content is protected !!