तरुण भारत

जर्मनीत गोवंशासाठी ‘रिटायरमेंट होम’

गायींना आरामात राहता यावे असा प्रयत्न

जर्मनीच्या बटजाडिंगन शहरात गायींसाठी रिटायरमेंट होम तयार करण्यात आले आहे. तेथे गायींना दूध देण्याची गरज नाही. त्यांच्याकडून केवळ खावे-प्यावे आणि आरामात रहावे इतकीच अपेक्षा केली जाते. गायींना नैसर्गिक वातावरण देण्यासाठी या रिटायरमेंट होममध्ये अन्य गोवंश, घोडे, श्वान, कोंबडय़ा आणि बदकांनाही ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे हे पाळीव पाण्यांचे अभयारण्यच ठरले आहे.

Advertisements

तेथे सर्व पाळीव प्राणी मुक्त वातावरणात राहतात. या प्राण्यांकडून कुठल्याही प्रकारचे काम करविले जात नाही. त्यांचा वापर आहारासाठीही करण्यात येत नाही. हे रिटायरमेंट होम कॅरिन मक आणि त्यांचे सहकारी जन गेरडेस चालवितात.

लोक बहुतांश प्राण्यांना मारून टाकू इच्छित होते. विशेषकरून जे प्राणी कुठल्याही कामासाठी उपयुक्त नव्हते त्यांची कत्तल केली जाणार होती, या प्राण्यांना आम्ही विविध ठिकाणांहून आणले आहे. हे प्राणी आता निवृत्तीचे जीवन आरामात घालवत आहेत. प्राण्यांकडून काम करविण्याची गरज नसल्याचे आमचे मानणे असल्याचे मक यांनी म्हटले आहे.

100 एकर क्षेत्र

पाळीव प्राण्यांचे हे अभयारण्य सुमारे 100 एकर क्षेत्रामध्ये फैलावलेले आहे. पूर्वी तेथे डेअरी फार्म होती. याचमुळे गायींसाठी सुलभ वातावरण मिळाले आहे. प्राणी कशाप्रकारे शांततेत जगू शकतील याचा विचार करण्याची गरज असल्याचे कॅरियन यांनी म्हटले आहे. प्राण्यांच्या देखभालीसाठी कॅरिन आणि गेरडेस यांना तीन युवा बहिणी मदत करतात. क्रिस्टीना बर्निंग, सेलीन आणि मिशेल अशी त्यांची नावे आहेत. क्रिस्टीना एका गायीला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवू इच्छित होती. तिचे वडिल गाय कत्तलखान्याला विकू पाहत होते. क्रिस्टीनाने वडिलांशी संघर्ष करत स्वतःच्या गायीला या रिटायरमेंट होममध्ये आणले.

जर्मनीत 20 लाख लोक शाकाहारी

मागील वर्षी जर्मनीत प्रतिव्यक्ती केवळ 57 किलो मांस सेवन झाले आहे. हा आकडा 1989 नंतरचा सर्वात कमी आहे. तर 32 वर्षांमध्ये जर्मनीतील शाकाहारी लोकांची संख्या वाढून 20 लाख झाली आहे. जर्मनीत शाकाहारी उत्पादनांना प्रोत्साहित केले जात आहे.

Related Stories

आयोडीनच्या सौम्य द्रावणाने कोरोना विषाणूचा नाश; शास्त्रज्ञांचा दावा

datta jadhav

नव्या नकाशाला मान्यता देण्यासाठी नेपाळकडून घटनादुरुस्ती

datta jadhav

कोरोनाच्या लसीला ‘सैतानाची लस’ संबोधिले

Patil_p

…तरच भारत-पाक संबंध सुधारतील

datta jadhav

चीनमध्ये हजारो लोकांना बॅक्टेरियल इन्फेक्शन

Patil_p

जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी सक्रीय

Patil_p
error: Content is protected !!