तरुण भारत

कलारीपयट्टूच्या अग्रदूत 77 वर्षीय मीनाक्षी

भारतातील सर्वात जुन्या मार्शल आर्टचा प्रचार-प्रसार, स्वतःच्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवितात ही कला

केरळच्या वाटकारा येथे राहणाऱया 77 वर्षीय मीनाक्षी अम्मा भारतातील सर्वात जुने कलारीपयट्टू युद्धकौशल्याच्या अग्रदूत प्रतिनिधी आहेत. मार्शल आर्टच्या या जुन्या कलेला चालना देण्यासाठी त्या झटत आहेत. त्यांना साडीमध्ये या युद्धकलेलचा सराव करताना पाहिले जाऊ शकते. वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी हे युद्धकौशल्या शिकण्याचे प्रारंभ केला होता.

Advertisements

मीनाक्षी अम्मा यांच्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांशी मुली असून त्यांचे वय 6-26 वर्षांदरम्यान आहे. जितक्या कमी वयात ही कला शिकण्यास प्रारंभ कराल तितके तुम्ही यात प्राविण्य प्राप्त करता असे मीनाक्षी अम्मा यांचे म्हणणे आहे. दरवर्षीच्या अखेरीस त्यांचे विद्यार्थी स्वतःच्या मर्जीने गुरुदक्षिणा देऊ शकतात. त्यांचे अनेक विद्यार्थी ही कला पुढे नेण्याचे काम करत आहेत.

माझ्या वडिलांनी कधीच कलारीपयट्टू शिकण्यापासून रोखले नसल्याचे मीनाक्षी अम्मा सांगतात. ही कला माझ्यासाठी वरदान असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. मीनाक्षी यांचा विवाह शाळेचे शिक्षक असलेल्या राघवन यांच्यासोबत झाला होता. तर मीनाक्षी अम्मा यांनी स्वतःचे प्रशिक्षण केंद्र सुरू करत कलारीपयट्टूचे धडे देण्यास सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी मीनाक्षी यांनी या कलारीपयट्टूचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला होता. मीनाक्षी यांचे या कलेबद्दलचे समर्पण पाहून त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलांनी वयाच्या 6 व्या वर्षापासून कलारीपयट्टू शिकण्यास सुरू केले होते. 2017 मध्ये मीनाक्षी अम्मा यांना पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. या वयातील त्यांचा उत्साह पाहून वय केवळ एक आकडा असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Related Stories

राफेल विमानांचे जल्लोषात आगमन

Patil_p

पंजाबमध्ये निहंगी टोळक्याने तलवारीने तोडला पोलिसाचा हात

Patil_p

देशात 13,788 नवे बाधित, 145 मृत्यू

datta jadhav

गो-तस्करी प्रकरणी तृणमूल नेत्यावर वॉरंट

Patil_p

अर्थसंकल्पाचे लाभ मांडणार भाजप

Amit Kulkarni

तेलंगणापासून केरळपर्यंत येणार भाजपचे सरकार!

Patil_p
error: Content is protected !!