तरुण भारत

प्रियांकाने विकली मुंबईतील मालमत्ता, भाड्याने दिले ऑफिस

अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्वतःच्या मालमत्तांवरून चर्चेत आहे. प्रियांकाने स्वतःच्या काही मालमत्ता विकल्या तर काही भाडेतत्वावर दिल्या आहेत. प्रियांकाने मुंबईतील मालमत्ता 7 कोटी रुपयांमध्ये विकली आहे. यात वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये राज क्लासिक इमारतीतील 7 व्या मजल्यावरील एक अपार्टमेंट सामील आहे. या अपार्टमेंटची किंमत 3 कोटी रुपये आहे. तर याच मजल्यावर एक अन्य अपार्टमेंट तिने 4 कोटी रुपयांमध्ये विकले आहे.

याचबरोबर तिने मुंबईतील स्वतःची कार्यालयीन जागा भाडेतत्वार दिली आहे. प्रियांकाचे 2040 चौरस फुटांचे ऑफिस असून या मालमत्तेमुळे तिला दर महिन्याला 2.11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मागील वर्षी तिने लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एक अपार्टमेंट विकले होते.

Advertisements

लॉस एंजिलिसमध्ये मालमत्तेची खरेदी

प्रियांका आणि तिचा पती निक जोनासने अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये घर खरेदी केले आहे. या दाम्पत्याने 20 हजार चौरस फुटांची मालमत्ता खरेदी केली असून याकरता 144 कोटी रुपये खर्च केले आहेत.

Related Stories

नातं असहय़ झाल्यास त्यातून बाहेर पडावे!

Amit Kulkarni

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरण : ड्रग्ज पेडलर हरीश खानला अटक, NCB ची कारवाई

Rohan_P

ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण

Rohan_P

पावनखिंडचा थरार चित्रपटगृहातच

Patil_p

‘आरसी-15’मधून झळकणार कियारा

Rohan_P

धक्कादायक ! लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या

triratna
error: Content is protected !!