तरुण भारत

ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू – नागरिकांमध्ये नाराजी

सिडनी

 कोरोना महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे पुन्हा एकदा अर्ध्या ऑस्टेलियात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. इंग्लंड आणि अमेरिकेने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन पुन्हा सुरू केल्याने सरकारवर दबाव वाढतो आहे. प्रशासनाने मंगळवारपासून लॉकडाऊनचा आदेश अंमलात आणला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्सच्या इतर भागांमधील नागरिकांनी घरीच राहण्याची विनंती प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामधील लोकसंख्येच्या 14 टक्के जणांचे आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. अत्यंत हळू चाललेल्या लसीकरणाच्या मोहिमेबद्दल प्रधानमंत्री स्कॉट मॉरीसन यांच्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये पाहता ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. एकूण 915 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला असून देशाच्या सीमा बंद करणे, क्वारंटाइनची सक्ती व लॉकडाऊन यासारख्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार म्हणावा तसा वाढलेला नाही.

Advertisements

Related Stories

ब्राझीलमध्ये बळींची संख्या 2 लाखांवर

Patil_p

आर्मेनिया-अजरबैजान यांच्यात युद्धसदृश स्थिती

Patil_p

सौदीत पर्यटन सुरू होणार

Patil_p

बायडेनचा पहिला वार सौदी अरेबियावर

Amit Kulkarni

ज्यू व्यक्तीच्या किडनीमुळे मुस्लीम महिलेला जीवदान

Patil_p

तुर्कस्थानातील भूकंपात 20 ठार

Patil_p
error: Content is protected !!