तरुण भारत

अमेरिकेत मंकीपॉक्सचे 200 रुण -प्रशासन झालं सतर्क

टेक्सास

 अमेरिकेमध्ये 27 राज्यांमध्ये सुमारे 200 जणांना मंकी पॉक्स या रोगाची लागण झाली असण्याचा संशय बळावला असून तेथील आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे.

Advertisements

आरोग्य अधिकाऱयांच्या मते टेक्सासमधील एक व्यक्ति मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आला होता, असे कळते. या महिन्याच्या सुरूवातीला टेक्सास येथील व्यक्तिने नायजेरीयातून हा रोग येथे आणला असल्याचा अंदाज अधिकाऱयांनी बांधला आहे. मंकी पॉक्सचा रुग्ण हा 2003 नंतर प्रथमच पुन्हा सापडला आहे. दरम्यान प्रशासनाने सदर मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तिला इस्पितळामध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले आहे. रोग नियंत्रण आणि खबरदारी केंद्राने याबाबत दिलेल्या माहितीनुसार सदरच्या व्यक्तिने दोन विमानातून प्रवास केल्याने सदरच्या विमानातील प्रवाशांमध्ये या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता बळावली असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. लॅगोस, नायजेरिया येथून सदरची व्यक्ति 9 जुलैला अटलांटा, जॉर्जिया येथे दाखल झाली होती.

Related Stories

जर्मन उद्योग कणखर

Omkar B

ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढ

Patil_p

फ्रान्समध्ये कोरोना चाचणी होणार मोफत

datta jadhav

भारत-चीन संघर्षात चीनचे 16 सैनिक ठार; चीनची कबुली

datta jadhav

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

Patil_p

तैवान : आदर्श उदाहरण

Patil_p
error: Content is protected !!