तरुण भारत

इटलीत आता कोरोना प्रमाणपत्राशिवाय नाही प्रवेश

रोम

 युरोपमधील इटली या देशाने 6 ऑगस्टपासून कोरोना प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. या संदर्भातली माहिती नुकतीच प्रशासनाने दिली आहे.  12 वर्षे आणि त्यावरील ज्यांनी पहिला कोरोनाप्रतिबंधक डोस घेतला आहे अशांना रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, जिम व इतर ठिकाणी जायचे असल्यास लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याबाबत सक्तीचा आदेश इटली सरकारने नुकताच जारी केला आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र लसीच्या प्रमाणपत्राची गरज नसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इटलीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाव्हायरसचे प्रमाण वाढले असल्याने शासनाला अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो आहे. इटलीमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले असून गेल्या काही आठवडय़ांमध्ये 5 हजारांहून अधिक जणांना याची लागण झाली असल्याची बाबही समोर आली आहे. इटलीतील निम्म्याहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. इटलीमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत 40 लाख जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती असून 1 लाख 28 हजार जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

Advertisements

Related Stories

शिकागोत सिरीयल किलिंग; 3 निष्पापांचा बळी

datta jadhav

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक

datta jadhav

वेडिंग ड्रेस घालून 285 किमीची दौड

Patil_p

फ्रान्समध्ये धार्मिक कट्टरवादावर कठोर प्रहार

Patil_p

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

triratna

नव्या महामारीचा धोका

Patil_p
error: Content is protected !!