तरुण भारत

ऑक्सिमीटर, थर्मामीटरच्या किंमतीमध्ये मोठी कपात

ट्रेड मार्जिन कमी केल्याने ग्राहकांना दिलासा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

ऑक्सिमीटर आणि डिजिटल थर्मामीटरसह पाच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांवरील व्यापाराचा नफा (ट्रेड मार्जिन) 70 टक्क्मयांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या उपचार आणि प्रतिबंधात मोठय़ा प्रमाणात वापरल्या जाणाऱया उपकरणांचे दर स्वस्त झाले आहेत. साहजिकच जवळपास 620 ब्रँडच्या किंमती कमी झाल्या आहेत. नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती शनिवारी रसायन व खत मंत्रालयाने ट्विटरवरून दिली. 23 जुलैपर्यंत 620 उत्पादनांमध्ये मॅक्सिमम रिटेल प्राईसमध्ये कपात केल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

वैद्यकीय उपकरणांची किंमत कोरोना काळात कमी केल्यामुळे सामान्यांच्या खिशाला बसणारा चटका हा काही प्रमाणात कमी झाला आहे. सद्यस्थितीत सरकारने पल्स ऑक्सिमीटर, रक्तदाब मॉनिटरिंग मशीन, नेब्युलायझर, डिजिटल थर्मामीटर, ग्लुकोमीटर वैद्यकीय उपकरणांवरील ट्रेड मार्जिन कमी केले आहे. या उपकरणांची मागणी आता मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे याचा पुरवठाही सरकार मोठय़ा प्रमाणात करत आहे. पल्स ऑक्सिमीटरच्या आयातीत ब्रँडद्वारे जास्तीत जास्त कपात केल्याची नोंद आहे. आयात आणि देशांतर्गत ब्रँडच्या सर्व श्रेणींमध्ये एमआरपीमध्ये घट झाली आहे.

Related Stories

राम मंदिर देणगी जमविणाऱया बनावट कार्यकर्त्यांना अटक

Amit Kulkarni

पाकिस्तानी शरणार्थींनी मानले भाजपचे आभार

Patil_p

जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबरला

Patil_p

उत्तर प्रदेश : दाट धुक्यामुळे कंटेनर आणि बसचा भीषण अपघात; 4 जण ठार

Rohan_P

लोकांच्या मदतीसाठी रिक्षाचे रुग्णवाहिकेत रुपांतर

Patil_p

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची दुसरी खेप दाखल

Patil_p
error: Content is protected !!