तरुण भारत

नव्या बाधितांमध्ये पुन्हा किंचित वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात सलग दुसऱया दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 39 हजार 097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 546 बाधितांनी जीव गमावला आहे. याचदरम्यान चोवीस तासात 35 हजार 087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी दिवसभरात 35 हजार 342 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. सध्या देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.34 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्मयांहून अधिक आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 1.30 टक्के आहे.

Advertisements

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. एकूण 4 लाख 8 हजार 977 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 32 हजार 159 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकंदर रुग्णांपैकी आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 3 हजार 166 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

लसीकरण मोहिमेंतर्गत 42 कोटींहून अधिक डोस

देशात 23 जुलैपर्यंत 42 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात 42 लाख 67 हजार लसींचे डोस देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. तसेच आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 45 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात 16.31 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

Related Stories

‘स्पुटनिक-व्ही’ लसीची दुसरी खेप दाखल

Patil_p

उत्तराखंड : 4 जणांचा मृत्यू; 293 नवीन कोरोना रुग्ण

Rohan_P

भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

datta jadhav

‘यास’च्या थैमानात लाखो लोक बेघर

Patil_p

पदवी अंतिम वर्ष-सेमिस्टर वगळता इतर विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p

बोलली जाणारी प्रत्येक भाषा ‘ईश्वरीय’

Patil_p
error: Content is protected !!