तरुण भारत

अपूर्वी, इलावेनिलला एअर रायफलमध्ये अपयश

10 मीटर्समधील भारताचे आव्हान संपुष्टात

इलावेनिल वलरिवन व अपूर्वी चंदेला या भारतीय महिला नेमबाजांना 10 मीटर्स एअर रायफलमध्ये अपयश आले. शनिवारी झालेल्या या इव्हेंटमध्ये या दोघी नेमबाज अंतिम फेरीतही पोहोचू शकल्या नाहीत.

Advertisements

चीनच्या क्वियान वांगने 8 महिलांच्या फायनलमध्ये सुवर्ण जिंकले. तिने 251.1 गुणांसह अव्वलस्थान काबीज केले. रशियन ऑलिम्पिक समितीच्या ऍनास्तासिया गॅलाशिनाने 251.1 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली तर स्वित्झर्लंडची निना ख्रिस्तियन 230.6 गुणांसह कांस्य जिंकले.

ऑलिम्पिक पदार्पण करत असलेल्या जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित इलावेनिलने क्वॉलिफिकेशनमध्ये 16 वे स्थान मिळवले. तिने 10 शॉट्सच्या 6 सिरीजमध्ये 626.5 गुण मिळवले. तिच्यापेक्षा अनुभवी असलेल्या अपूर्वी चंदेलाने मात्र असाका रेंजवर झालेल्या या इव्हेंटमध्ये 621.9 गुणांसह निराशा केली.

विशेषतः दुसऱया सेटमध्ये अपूर्वीने खूपच निराशा केली. इलावेनिलने तिसऱया सिरीजमध्ये 10.9 चा परफेक्ट शूट केला. मात्र, हाच फॉर्म तिला कायम राखता आला नाही आणि चौथ्या, पाचव्या प्रयत्नात 9 च्या सरासरीत राहिल्याने ती एकूण क्रमवारीत खाली फेकली गेली.

28 वर्षीय अपूर्वीने 2019 मध्ये 2 विश्वचषक सुवर्ण जिंकले असल्याने येथे तिच्याकडून बऱयाच अपेक्षा होत्या. मात्र, ती त्यांना खरे उतरु शकली नाही. यापूर्वी 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला 34 व्या स्थानी समाधान मानावे लागले होते.

प्रारंभी, नॉर्वेच्या जिनेट हेग डस्टेडने क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये 632.9 च्या विक्रमी स्कोअरसह अव्वलस्थान प्राप्त केले. दक्षिण आफ्रिकन हिमन पार्क 631.7 गुणांसह दुसऱया स्थानी तर अमेरिकेन चॅलेंजर मेरी कॅरोलिन टकर 631.4 गुणांसह तिसऱया स्थानी राहिली होती.

सातत्याने उच्चांकी स्कोअर नोंदवले जात असताना इलावेनिल ही गॅलाशिनापेक्षा 2 गुणांनी पिछाडीवर फेकली गेली. गॅलाशिना नंतर 628.6 गुणांसह आठव्या म्हणजेच शेवटच्या स्थानी राहिली. यानंतर महिला 10 मीटर्स एअर रायफलमधील भारताचे आव्हान संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले. अपूर्वी व अंजूम मोदगिल यांनी 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवत टोकियो ऑलिम्पिकसाठी या जागा पटकावल्या होत्या. येथे टोकियोत महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये विक्रमी 50 स्पर्धक रिंगणात होते.

क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये 75 मिनिटांच्या निर्धारित वेळेत 0.177 इंच कॅलिबर एअर रायफलने 60 शॉट्स घेतले गेले आणि 10.9 हा त्यातील परफेक्ट शॉट होता. शक्य असलेल्या 654 पैकी 630 व त्याहून अधिक गुण घेतल्यास 8 फायनलिस्टमध्ये समाविष्ट होण्यास ते पुरेसे ठरते, असे यातील एकंदरीत चित्र असते.

चीनच्या वांगला टोकियोचे पहिले सुवर्ण

महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल गटातील इव्हेंटमधील विजेती चीनची यांग क्वियान टोकियो ऑलिम्पिकमधील पहिली सुवर्णकन्या ठरली. यापूर्वी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये देखील चीननेच पहिले सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी यि सिलिंग असा पराक्रम गाजवण्यात यशस्वी ठरली होती. चीनच्या यांगने शनिवारी येथे 6 वे स्थान मिळवत फायनलसाठी पात्रता संपादन केली. तिने 60 शॉट्समध्ये 628.7 स्कोअरसह अंतिम फेरीत धडक मारली होती.

हेगचा ऑलिम्पिक विक्रम, तरीही…

क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये नॉर्वेच्या हेगने 632.9 अंकांचा क्वॉलिफिकेशन ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवला. अर्थात, अंतिम फेरीत हेगला या ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशनमधील रेकॉर्डचा काहीच उपयोग होणार नव्हता. अंतिम फेरीत नव्याने सुरुवात करणे भाग होते. प्रत्यक्षात हेगला अंतिम फेरीत आपला अव्वल फॉर्म कायम राखता आला नाही आणि ती चौथ्या स्थानी राहिल्याचे अंतिमतः स्पष्ट झाले.

शेवटच्या दोन फेऱया बाकी असताना यांग 0.2 फरकाने मागे होती. पण, आयओसीच्या गॅलाशिनाने फायनल शॉटमध्ये 8.9 गुण नोंदवल्याने यांगला तिच्या शेवटच्या फेरीत 9.8 गुण मिळवले तरी सुवर्ण जिंकण्यासाठी ते पुरेसे ठरणार होते.

Related Stories

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव

Patil_p

कर्नाटकाच्या विजयात पडिक्कलचे शतक

Patil_p

विंडीजचा लंकेविरुद्ध मालिकाविजय

Patil_p

लिपझिगचा हॉफेनहेमवर एकतर्फी विजय

Patil_p

जोकोव्हिचकडून बेलकेन टेनिस स्पर्धेची घोषणा

Patil_p

सोलापूर : युवा चित्रकार विपुलने साकारली रोहित शर्माची पोर्ट्रेट रांगोळी

triratna
error: Content is protected !!