तरुण भारत

झिम्बाब्वेचा बांगलादेशवर 23 धावांनी विजय

वृत्तसंस्था / हरारे

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवारी यजमान झिम्बाब्वेने दुसऱया सामन्यात बांगलादेशचा 23 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली. झिम्बाब्वेच्या मधेवेरेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisements

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकात 6 बाद 166 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 19.5 षटकात 143 धावांत आटोपला.

झिम्बाब्वेच्या डावात मधेवेरेने 57 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 73, छकब्वाने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14, मेयर्सने 21 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, ब्युरेलने 19 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 34 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस. इस्लामने 33 धावांत 3 तर मेहदी हसन व शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात शमीम हुसेनने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 29, अतिफ हुसेनने 25 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 24, मोहम्मद सैफुद्दिनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, मेहदी हसनने 2 चौकारांसह 15 तर शकीब अल हसनने 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे जाँग्वेने 31 धावात 3 तर मासाकेझाने 20 धावात 3 त्याचप्रमाणे छतारा आणि मुझारबनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. झिम्बाब्वे संघाने बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी तसेच त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेत झिम्बाब्वेने पहिला विजय मिळवून बरोबरी साधली असून आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक

झिम्बाब्वे- 20 षटकात 6 बाद 166 (मधेवेरे 73, ब्युरेल नाबाद 34, मेयर्स 26, छकब्वा 14, एस. इस्लाम 3-33, मेहदी हसन 1-11, शकीब अल हसन 1-32), बांगलादेश- 19.5 षटकात सर्वबाद 143 (शमीम हुसेन 29, अतिफ हुसेन 24, मोहम्मद सैफुद्दिन 19, मेहदी हसन 15, शकीब अल हसन 12, जाँग्वे 3-31, मासाकेझा 3-20, छतारा 2-24, मुझारबनी 2-21).

Related Stories

ब्राझीलच्या क्रिव्हेलारोच्या मुक्कामात वाढ

Patil_p

पंकज अडवाणीकडून पाच लाखांची मदत

Patil_p

भारताचे पात्र फेरीचे फुटबॉल सामने लांबणीवर

Patil_p

नीरज चोप्रा : 87.86 मीटर भालाफेक करत पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट

prashant_c

सनरायजर्स-आरसीबी एलिमिनेटर लढत आज

Patil_p

बोरुसिया डॉर्टमंडचा एकतर्फी विजय

Patil_p
error: Content is protected !!