तरुण भारत

टोरँटो स्पर्धेतून जोकोविचची माघार

वृत्तसंस्था/ टोरँटो

सर्बियाचा टॉप सीडेड पुरुष टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचने एटीपी टूरवरील पुढील महिन्यात येथे खेळविल्या जाणाऱया टोरँटो खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Advertisements

जोकोविचने 2021 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन, प्रेंच आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. आता तो टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदाकासाठी सज्ज झाला आहे. भरगच्च कार्यक्रमामुळे जोकोविचवर अधिक ताण पडत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्याने टोरँटो स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय जाहीर केला. जोकोविच आता जर्मनीची माजी अव्वल टेनिसपटू स्टेफी ग्राफच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 1988 साली स्टेफी ग्राफने वर्षभरातील खेळविण्यात येत असलेल्या चारही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने त्याच वर्षात सेऊल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही मिळविले होते. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. 23 जुलैपासून सुरू झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून विविध देशांच्या अव्वल पुरुष आणि महिला टेनिसपटूंनी विविध समस्यांमुळे माघार घेतली आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, स्पेनचा नदाल तसेच स्वीसचा वावरिंका टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.

Related Stories

दिल्लीचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग दुबईत दाखल

Patil_p

विनेश फोगटची शिबिरातून माघार

Patil_p

स्पेन संघात बुस्केटचे पुनरागमन

Patil_p

पहिल्या वनडेत भारत अ विजयी

Patil_p

जर्मनीत प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेला प्रारंभ

Patil_p

सुदैव आपल्या बाजूने असेल ही मुख्य अपेक्षा

tarunbharat
error: Content is protected !!