तरुण भारत

इस्त्रायलच्या ऍथलिटविरुद्ध लढण्यास नकार, ज्युडोका नौरिन निलंबित

आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनची कारवाई, प्रशिक्षकाला देखील निलंबनाची शिक्षा

समोरचा प्रतिस्पर्धी इस्त्रायलचा असल्याने त्याच्याविरुद्ध लढण्यास नकार देणाऱया अल्जेरियन ज्युडोका फेथी नौरिन व त्याचा प्रशिक्षक बेनिक्लेफ यांना आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने तातडीने निलंबित केले. नौरिनने माघारीसाठी जे कारण दिले, ते ज्युडो संघटनेच्या तत्त्वात बसत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या उभयतांना तत्काळ निलंबित करत असल्याचे घोषित केले. याप्रकरणी अधिक चौकशीचे आदेश देखील त्यांनी जारी केले आहेत.

Advertisements

अगदी अल्जेरियन ऑलिम्पिक कमिटीने देखील या दोघांचे ऍक्रेडेशन रद्द केले असून त्यांना तातडीने मायदेशी रवाना करत असल्याचे म्हटले. याबाबत नौरिनची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

यापूर्वी, शुक्रवारी नौरिनने अल्जेरियन माध्यमांशी बोलताना, आपला राजकीय पाठिंबा पॅलेस्टिनियनना असल्याने इस्त्रायलच्या तोहर बूतबूलविरुद्ध लढणे आपल्याला शक्य नसल्याचे म्हटले होते. अर्थात, नौरिनने इस्त्रायलच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध माघार घेण्याची ही पहिली वेळ अजिबात नाही. यापूर्वी टोकियोतच झालेल्या 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील त्याने इस्रायली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध लढणे टाळले होते. इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये आताही तणावपूर्ण वातावरण असून अगदी इराण व इजिप्त देशाच्या ऍथलिट्सनी देखील यापूर्वी इस्रायलच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढण्यास नकार दिला आहे.

Related Stories

इसाक वनमलसामा ओडिशा एफसीत दाखल

Amit Kulkarni

व्हेरेव्हची प्रशिक्षकाबरोबर फारकत

Patil_p

INDvsENG अंतिम सामन्यासह भारताचा 3-2 ने मालिका विजय

triratna

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

Patil_p

सर्बियाचा डिजेरचे एटीपीवरील दुसरे जेतेपद

Patil_p

मँचेस्टर सिटीचा बर्नलीवर मोठा विजय

Patil_p
error: Content is protected !!