तरुण भारत

भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव

वृत्तसंस्था/  टोकियो

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला अ गटातील  सलामीच्या सामन्यात टॉप सीडेड हॉलंडकडून पराभव पत्करावा लागला. शनिवारी येथे झालेल्या प्राथमिक गटातील सलामीच्या सामन्यात हॉलंडने भारताचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला.

Advertisements

या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय महिला हॉकी संघाने हॉलंडला कडवी लढत दिली पण त्यानंतर उत्तरार्धात हॉलंडच्या खेळाडूंनी आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर भारताच्या बचावफळीवर तसेच गोलरक्षकावरही दडपण आणले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. सामन्यातील सहाव्या मिनिटाला फेलीसी अल्बेर्सने हॉलंडचे खाते उघडले. भारतीय संघाची कर्णधार रानी रामपालने 10 व्या मिनिटाला गोल करून हॉलंड संघाशी बरोबरी साधली होती.

मध्यंतरानंतर हॉलंडच्या आक्रमक चढायासमोर भारतीय संघ बचाव करण्यास कमकुवत ठरला. 33 व्या मिनिटाला हॉलंडचा दुसरा गोल व्हॅन गेफीनने नोंदविला. 43 व्या मिनिटाला अल्बेर्ल्सने हॉलंडचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. मॅटेलाने 45 व्या मिनिटाला हॉलंडचा चौथा गोल नोंदविला. 52 व्या मिनिटाला मॅसेकेरने आपल्या संघाला मिळालेल्या सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर हॉलंडचा पाचवा गोल नोंदवून भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आता अ गटात भारतीय महिला संघाचा पुढील सामना जर्मनीबरोबर सोमवारी 26 जुलैला होणार आहे.

Related Stories

रवि शास्त्रीसह प्रशिक्षक स्टाफचे दुबईत आगमन

Patil_p

मुंबईचा अडथळा पार करण्याचे सनरायजर्सपुढे आव्हान

Patil_p

लाबुशानेचे शतक, नटराजनला दुहेरी यश

Patil_p

माजी क्रिकेटपटू प्रशांत मोहपात्रा यांचे कोरोनाने निधन

Patil_p

यंदाची आयपीएल जुलैमध्ये खेळवण्याचे प्रयत्न

Patil_p

आर्चरच्या गैरहजेरीत मॉरिसकडे मुख्य धुरा

Patil_p
error: Content is protected !!