तरुण भारत

पूरग्रस्त भागात कराडकरांनी खबरदारी घ्यावी

जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांचे आवाहन, पूरग्रस्त भागाची पाहणी

प्रतिनिधी/ कराड

Advertisements

कराडला महापुराचे पाणी स्व. यशवंतराव चव्हाण समाधीसह दुकानगाळे, घरांमध्ये शिरले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी सकाळी कराडला दत्त चौक, कृष्णा घाट परिसरात पाहणी केली. कराड व पाटण तालुक्यात पावसाचा जोर ओसरला असला, तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांनी जोपर्यंत प्रशासन सांगत नाही, तोपर्यंत त्या भागात जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. 

बन्सल यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून स्थलांतरीत नागरिकांशी संवाद साधला. पोलीस बंदोबस्ताच्या सूचना देत त्यांनी नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, कराड ग्रामीणचे बाळासाहेब भरणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बन्सल म्हणाले, सातारा जिह्यात पाटण तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसला आहे. सातारा जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळी पथके मिरगाव, आंबेघर भागात मदतकार्यात गुंतली आहेत. शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याने दिलासा मिळाला आहे. कराड परिसरातही पोलीस व नगरपरिषद यांनी प्रसंगावधान दाखवल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पावसाचा जोर ओसरल्याने पाणीपातळी कमी होत आहे. मात्र तरीही नागरिकांनी पूर आलेल्या ठिकाणी प्रशासनाने सांगितल्याशिवाय जाऊ नये.

Related Stories

शाहूपुरीत टोळक्याकडून मारहाणीत युवक जखमी

Patil_p

कोल्हापूर : करनूर शाळा ठरणार जिल्ह्यातील पहिली ‘दिल्ली पॅटर्न’ शाळा

triratna

सातारा : मंदिर सेवेकऱ्याचा भक्तांना अडीच लाखाला गंडा

triratna

कोरोना रूग्णांना आता घरीच ऑक्सीजन मिळणार

Patil_p

वाहतूक शाखेचा कारभार गोंडसेंच्या खांद्यावर

Patil_p

सांगली : मिरज कोविड रुग्णालयातील तीन कर्मचारी कोरोना बाधित

triratna
error: Content is protected !!