तरुण भारत

पोसरे दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 वर पोहोचली

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यातील धामणंद विभागातील पोसरे-बौद्धवाडीतील दरड दुर्घटनेतील शनिवारी  दिवसभरात केवळ संगीता विष्णू मोहिते या 65 वर्षीय वृद्धेचा मृतदेह हाती लागला. मृतांची संख्या 5 वर पोहोचली असून 12 बेपत्तांचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.  एनडीएफआरच्या पथकासह स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने शोधकार्याला गती देण्यात आली आहे.

Advertisements

धो-धो कोसळणाऱया पावसामुळे पोसरे-बौद्धवाडी येथे दरड कोसळून 7 कुटुंबातील 17 जण मातीच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले. या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर वावे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. दुर्घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत वैशाली वसंत मोहिते (46), धोंडिराम देवू मोहिते (71), सविता धोंडिराम मोहिते (69), विहान संदेश मोहिते (5) या चौघांचे मृतदेह हाती लागले होते. रंजना रघुनाथ जाधव, रघुनाथ जाधव, विकास विष्णू मोहिते, सुनील धोंडिराम मोहिते, सुनीता धोंडिराम मोहिते, आदेश सुनील मोहिते, काजल सुनील मोहिते, सुप्रिया सुदेश मोहिते, वसंत धोंडिराम मोहिते, प्रती वसंत मोहिते आदी मातीच्या ढिगाऱयाखालीच आहेत. शनिवारी दिवसभर पुणे येथून मागवण्यात आलेल्या एनडीआरएफच्या 2 पथकांमार्फत बचावकार्य राबवण्यात आले. या बचावकार्यात केवळ एका वृद्धेचा मृतदेह हाती लागला आहे. मृतांची संख्या 5 झाली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

तळाशिल येथील युवकाची आत्महत्या

NIKHIL_N

चार वर्षांतील ‘इंदिरा आवास’ही मग अनधिकृतच

NIKHIL_N

खरेदी-विक्री संघाकडून सेंद्रीय खत निर्मिती

NIKHIL_N

जिल्हय़ाचा पारा चढला, वादळी पावसाचा इशारा

Patil_p

एमपॉवरतर्फे कोविड-19 साठी 24 तास हेल्पलाईन सुरू

Patil_p

भाजी विपेत्यांवरील कारवाईने ‘रणकंदन’

NIKHIL_N
error: Content is protected !!