तरुण भारत

अल्पवयीनावर लैंगिक अत्याचारप्रकरणी बेळगावमार्गे आरोपीला आणले मडगावी

प्रतिनिधी/ मडगाव

दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील रहिम खान (24) या आरोपीला शनिवारी सायंकाळी बेळगावमार्गे मडगावात आणण्यात आले.

Advertisements

मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरादाबाद येथे गेलेल्या पोलिसांच्या एका पथकाने या आरोपीला जेरबंद केले होते. त्यानंतर मुरादाबादहून आरोपीला  रेल्वेमार्गे गोव्यात आणण्यात येत होते.

मात्र, महाराष्ट्रातील काही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली असल्यामुळे काही तास कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती तर अन्यत्र वळविण्यात आली होती.  आरोपीला घेऊन येत असलेले मडगाव पोलीस पथक पुण्याला जवळ जवळ एक दिवस अडकून राहिल्यानंतर या पथकाने बेळगावमार्गे मडगावाकडे कूच केली.

रस्तामार्गे बेळगावहून मडगावात आल्यानंतर लगेच या आरोपीला न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या आरोपीला चार दिवस पोलीस कोठडीत ठेऊन त्यांची चौकशी करण्यासाठी मुदत दिली.

आरोपी गेले सहा महिने फरार होता. मडगाव व उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरातील अंतर अंदाजे 1900 किलोमीटर इतके आहे. इतक्या दूरवर जाऊन मडगाव पोलीस पथकाने आरोपीला जेरबंद केले याप्रकण्री मडगाव पोलिसांच कौतूक होत आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित युवती ही 15 वर्षाची असून या अल्पवयीन मुलीवर मुरादाबादा येथील रहिम खान (24) याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या मुलींची फरारी आई व तिचा प्रियकर उर्फ आरोपी रहीम खान उत्तर प्रदेशातील अमूक ठिकाणी असल्याची खबर मडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर एक पोलीस पथक त्या राज्यातील मुरादाबाद येथे गेले होते.

त्या राज्यातील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने मडगाव पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला भारतीय दंड संहितेच्या 276 कलमाखाली तसेच गोवा बाल कायद्याच्या 8 व्या कलमाखाली अटक केली. लग्नाचे आमीष दाखवून आरोपी रहीम खान याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. 

 या प्रकरणी आरोपी रहीम खानविरुद्ध मडगाव पोलीस स्थानकात तक्रारही नोंद करण्यात आलेली आहे. आरोपी रहीम खान व या मुलींची आई दोघेही फरार झाली होते. दोघांनाही जेरबंद करण्यात आले आहे.

Related Stories

साखळीत मनोजकुमार घाडी यांचा आपमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचा टॅक्सी चालकांचा निर्णय

Patil_p

एफसी गोवाचा सामना आज चेन्नईनशी

Amit Kulkarni

म्हापसा श्री देव बोडगेश्वराचा 27 वा वर्धापनदिन उत्साहात

Patil_p

घोषणाबाजी करून सरकारचा केला निषेध उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर

Omkar B

अडचणीत असलेल्या 80 सुवर्ण कारागिरांना आर्थिक साहाय्य

Omkar B
error: Content is protected !!