तरुण भारत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे दाबोळीत उत्साही स्वागत

प्रतिनिधी/ वास्को

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे शनिवरी दुपारी गोव्यात आगमन झाले. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी नड्डा यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री मिलिंद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड, माजी खासदार नरेंद्र सावईकर, पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, माजी आमदार दामू नाईक, मुरगांवचे नगराध्यक्ष दामू कासकर, मुरगावचे नगरसेवक, स्थानिक पंच व इतर मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास दाबोळी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर त्यांचे मुख्यमंत्री, मंत्री व इतर मान्यवर नेत्यांनी स्वागत केले. विमानतळाच्या बाहेरील आवारात वास्को, मुरगाव, दाबोळी व कुठ्ठाळीतील कार्यकर्ते नड्डा यांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने जमले होते. जे.पी. नड्डा बाहेर येताच कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. ढोल ताशांचा गजर करीत नड्डा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नड्डा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हात उंचाऊन प्रतिसाद दिला. त्यानंतर ते पणजीला रवाना झाले. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जे.पी. नड्डा दुसऱयांदा गोव्यात आले आहेत. ते दोन दिवसांच्या गोवा दौऱयावर आहेत. येत्या सहा महिन्यांत गोव्यात होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने त्यांच्या गोवा भेटीला महत्त्व आलेले आहे. पक्षाचे मंत्री, आमदार, प्रदेश समिती व नेत्यांसमवेत बैठका घेऊन ते विधानसभा निवडणुकांसंबंधी व इतर राजकीय विषयांवर चर्चा करतील.

दरम्यान, वास्कोहून जे. पी. नड्डा विवांता हॉटेलात दाखल झाले. यावेळी कृषिमंत्री बाबू कवळेकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात व इतर मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी ओवाळणी केली. 

राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आमदार, मंत्र्यांच्या बैठका

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असताना भाजपने त्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपने राज्यातील प्रत्येक मतदारसंघाचा लेखाजोखा तटस्थ यंत्रणेकडून तयार करून घेतला होता. त्याच्या आधारे राष्ट्रीय अध्यक्षांनी चर्चा झाली असल्याचेही सूत्रंानी सांगितले. प्रदेश पदाधिकारी, विविध मोर्चाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री, यांच्यासोबत विधानसभा निवडणूक तयारीच्या आढाव्याच्यादृष्टीने नड्डा यांच्यासोबत बैठका झाल्या. यावेळी विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली, असेही सूत्रांनी सांगितले.    

नड्डा यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम

आज रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सकाळी साडेआठच्या सुमारास मंगेशी येथील श्री देव मंगेशाचे दर्शन घेणार आहेत. काही मोजक्याच नेत्यांसह नड्डा यांचा दौरा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंगेशीहून परतताना सकाळी 9.30 वाजता कुंडई तपोभूमी येथे वृक्षारोपण करतील व ब्रह्मेशानंद स्वामी यांची सदिच्छा भेट घेतील. त्यानंतर पणजी येथील डॉन बॉस्कोमधील लसीकरण केंद्राला भेट देणार आहेत. बोक-दöव्हाक येथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम श्रवण करतील. यावेळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12 वाजता ते पक्षाच्या प्रदेश गोवा समितीची बैठक घेणार आहेत. सव्वातीनच्या सुमारास येथील विवांता हॉटेलमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधतील त्यानंतर ते सायंकाळी चार वाजता परत दिल्लीला जाण्यास रवाना होणार आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.

भाजपाचा विजय निश्चित ः मुख्यमंत्री राज्यातील कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यास येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय नक्कीच असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पत्रकारांशी बोलताना सांगितले

Related Stories

भरमसाठ बिलांसंदर्भात वीज ग्राहकांना दिलासा

Omkar B

आंचिमचा आज समारोप

Patil_p

पाण्यात अडकलेली वळवई-सुर्ला फेरीबोट पोचविली धक्यावर

Patil_p

बेकायदेशीर घरांचीही होणार कर वसुली

Omkar B

भगवे वस्त्र परिधान करून रेजिनाल्ड पोहोचले मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर

Amit Kulkarni

पोक्सो गुन्हय़ातीलआरोपीस अटक

Patil_p
error: Content is protected !!