तरुण भारत

खानापुरातील अनेक उपनगरांना पुराचा फटका

खानापूर/ वार्ताहर

खानापूर तालुक्मयात झालेल्या धुवाधार अतिवृष्टीमुळे मलप्रभा नदीला महापूर आला आहे. पण शुक्रवारी दुपारनंतर पाऊस थांबल्यामुळे तसेच सौंदत्ती डॅममधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर मलप्रभा नदीचा पूर वेळीच आटोक्मयात आला. त्यामुळे खानापूर शहराला बसलेल्या महापुराच्या विळख्यातून दिलासा मिळाला आहे.

Advertisements

 मलप्रभा नदी आरपार झाल्याने खानापूर शहराच्या उपनगरांतील दुर्गानगर, मारुतीनगर तसेच रुमेवाडी क्रॉस परिसरातील जवळपास 300 हून अधिक घरे पाण्याखाली गेली होती. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता अनेक कुटुंबीयांनी आपले साहित्य सुरक्षितस्थळी वेळीच हलविल्याने नुकसान टळले आहे. तीन-चार घरांची मात्र मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे. या पुराच्या प्रवाहाने नदीघाटाकडील पाणी अडविण्याच्या बंधाऱयाच्या कुप्पटगिरी क्रॉसजवळील रस्त्याची वाताहत झाली आहे. या ठिकाणी टाकण्यात आलेला भराव पुन्हा वाहून गेल्याने 2019 च्या महापुराची पुनरावृत्ती झाली आहे.

मासळी मार्केटची वाताहत

 शहरालगत महामार्गावर असलेल्या मासळी मार्केटची पूर्णतः वाताहत झाली आहे. मासळी मार्केटच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारपर्यंत जवळपास 10 फूट पाणी आले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे मासळी मार्केटमधील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी मासळी मार्केट संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

 दरम्यान, याच मासळी मार्केटच्या दुसऱया बाजूला अनेक व्यावसायिक दुकाने थाटून आहेत. त्या ठिकाणी असलेले हॉटेलमालक, स्टील दुकान तसेच फरशी दुकानधारकांचेही नुकसान झाले आहे. सिमेंटसह साहित्याची मोठी हानी झाल्याने शासनाकडून आम्हाला नुकसानभरपाई मिळेल का, अशी प्रतिक्रिया  व्यावसायिकांनी केली आहे. शहर-उपनगरांतील अनेकांच्या फर्निचर साहित्यासह जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 2019 नंतर दुसऱयांदा आलेल्या या महापुराचा धसका नागरिकांनी घेतला आहे.

Related Stories

समाधानकारक बरसात, शेतकऱयांची धांदल

Patil_p

खानापुरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद

Rohan_P

म. ए.समिती कार्यकर्त्यांच्या ‘त्या’ खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

Amit Kulkarni

बुलकमध्ये विंदांच्या कवितांवर व्याख्यान

Patil_p

महांतेशनगर येथे सोसायटी फोडली

Patil_p

साडेसतरा तास चालले गणेश विसर्जन सोहळा

Amit Kulkarni
error: Content is protected !!