तरुण भारत

पावसामुळे जिल्हय़ातील सात तालुक्यांना फटका

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हय़ामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सात तालुक्मयांतील 113 गावांना मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे दोन जणांचा बळी गेला आहे तर 16 घरे कोसळली आहेत. जिल्हय़ातील 771 घरांची पडझड झाली आहे. 19 हजार 35 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 36 हजार 308 हेक्टरमधील पिके खराब झाली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 20 हजार 895 जणांना या पावसामुळे नुकसान सहन करावे लागले आहे.

Advertisements

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे विविध ठिकाणी पूर आला. काही पूल पाण्याखाली गेले. सरकारी आणि खासगी मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हय़ातील बेळगाव, खानापूर, हुक्केरी, गोकाक, मुडलगी, चिकोडी, निपाणी या तालुक्मयांना पुराचा फटका बसला आहे. या पावसामुळे काही गावे स्थलांतरित करावी लागली आहेत. त्यांच्यासाठी 89 निवारा केंदे स्थापन करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी 19 हजार 35 जणांची व्यवस्था केली आहे.

या पावसाचा फटका जनावरांनाही बसला आहे. पुरामुळे 3 जनावरे दगावली असून 8 हजार 795 जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत. 39 शाळांची पडझड झाली आहे. जिल्हय़ातील 45 पुलांवर पाणी आले होते. 56.63 कि.मी. रस्ता पावसामुळे खराब झाला आहे. 94 विद्युत खांब खराब झाले आहेत. 45 ट्रान्स्फॉर्मरही खराब झाले असल्याने हेस्कॉमलाही मोठा फटका बसला आहे.

या पावसामुळे जीवित हानी झाली आहे. काही जणांना वाचविण्यात यश आले आहे. जिल्हय़ातील 36 हजार 308 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर 1735 हेक्टरमधील बागायत पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. एकूणच या पावसामुळे मोठा फटका बसला असून अजूनही याबाबतचा सर्व्हे सुरू आहे.

Related Stories

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून कुडची मुख्याधिकाऱयांची प्रशंसा

Patil_p

येळ्ळूरमध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ास प्रारंभ

Amit Kulkarni

दौडच्या संस्कारातून घडतेय युवापिढी

Patil_p

पंचायतराज खात्याच्या अधिकाऱयांची बेळगावला भेट

Amit Kulkarni

बेळगाव डायबेटीज सेंटरची यशस्वी वाटचाल

Amit Kulkarni

रायबाग तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Rohan_P
error: Content is protected !!