तरुण भारत

मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आज बेळगावात

पूरग्रस्त भागाची करणार पाहणी

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा रविवार दि. 25 जुलै रोजी बेळगाव जिल्हय़ाच्या दौऱयावर येणार आहेत. आपल्या या दौऱयात ते नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत.

रविवारी सकाळी 9 वाजता बेंगळूर येथील एचएएल विमानतळावरून विशेष विमानाने मुख्यमंत्री बेळगावला निघणार आहेत. सकाळी 10.15 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर 11 वाजता संकेश्वरला भेट देऊन मठ गल्ली, कुंभार गल्ली परिसराची पाहणी करण्याबरोबरच शंकरलिंग कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्राला भेट देणार आहेत.

दुपारी निपाणी तालुक्मयातील 12.10 वाजता यमगर्णीला, 12.20 वाजता कोडणी येथे परिस्थितीची पाहणी करून 1.50 वाजता ते बेळगावला परतणार आहेत. 1.50 ते 2.30 ही वेळ सरकारी विश्रामधाम येथे राखीव ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 2.30 वाजता पालकमंत्री, जिल्हय़ातील आमदार, खासदार व अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. 4 वाजता विशेष विमानाने मुख्यमंत्री बेंगळूरला रवाना होणार आहेत.

Related Stories

डॉ.प्रभाकर कोरे यांनीही घेतली प्रचारात आघाडी

Amit Kulkarni

जल जीवन मिशनतर्फे प्रत्येक घराला होणार नळजोडणी

Patil_p

मनपाची अंतिम मतदारयादी आज होणार प्रसिद्ध

Omkar B

पत्रकारांनाही साहित्याचे वितरण

Patil_p

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

Amit Kulkarni

बंगल्यांच्या सर्व्हेक्षणास रहिवासी संघटनेचा आक्षेप

Patil_p
error: Content is protected !!